"दया, दरवाजा तोड दो..."; CID ची टीम परत येतेय, नवीन शो ची घोषणा | VIDEO

CID New Show : CID चे कलाकार नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दया म्हणजेच दयानंद शेट्टीने नवीन शोची घोषणा केली.
CID New Show
CID saam tv
Published On
Summary

CID पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

CID च्या टीमने नवीन शोची केली घोषणा

CID हा क्राईम-थ्रिलर टीव्ही शो आहे

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत CID चे जगभरात चाहते आहेत. विशेषता तरूणाई हा शो आवडीने पाहते. सीआयडी हा लोकप्रिय क्राईम-थ्रिलर टीव्ही शो आहे. या शोमधील पात्र आजही प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटतात. अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युमनची क्रेझ आजही पाहायला मिळते. 'सीआयडी'चा दुसरा सीझन डिसेंबर 2025 ला संपला. आता प्रेक्षक 'सीआयडी'च्या नव्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशात आता CID च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

'सीआयडी'मध्ये 'दया'ची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी याने इतर कलाकारांसोबत मिळून नवीन शोची घोषणा केली आहे. यासंबंधित खास व्हिडीओज अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवीन शोचा निर्माता दयानंद शेट्टी असेल. 'सीआयडी'चे कलाकार या शोच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नव्या शोमध्ये 'दया'सोबत एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, अभिजीतची भूमिका साकारणारे आदित्य श्रीवास्तव, पूर्वीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंशा सय्यद आणि पंकजची भूमिका साकारणारा अभिनेता अजय नागरथ झळकणार आहे. मात्र अद्याप शोचे नाव, शो कधी सुरू होणार, शो कुठे पाहायला मिळणार, नेमका शो असणार काय आणि इतर कलाकार कोण झळकणार याची अधिकृत माहिती समोर आली नाही. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दयानंद शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओत दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन, पूर्वी आणि पंकज व्हिडिओ कॉलवर एकत्र बोलताना दिसत आहेत. अभिजीत दयाला विचारतो की, "सर्वजण एकत्र का जमले आहेत आणि त्यांच्याकडे काही नवीन कल्पना आहे का?" दया उत्तर देत म्हणतो की, "आपले आपल्या चाहत्यांशी २५ वर्षांचे नाते आहे, आपण ते असे कसे सोडू शकतो..." मग सर्वजण आपापसात चर्चा करताना दिसतात. त्यानंतर नवीन शोची घोषणा करतात.

CID New Show
Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com