CID 2: 'सीआयडी २' मध्ये पुन्हा दिसणार एसीपी प्रद्युम्न; शिवाजी साटम करणार लवकरच कमबॅक

CID 2: 'सीआयडी २' या नव्या पर्वात चाहत्यांचे लाडके एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम पुन्हा एका दमदार भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
CID 2
CID 2Saam Tv
Published On

CID 2: भारतातील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली गुन्हेगारी विषयावर आधारित मालिका 'सीआयडी' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सीआयडी २' या नव्या पर्वात चाहत्यांचे लाडके एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम पुन्हा एका दमदार भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समजल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

शिवाजी साटम यांनी ‘सीआयडी’ मालिकेत तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळ एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारली होती आणि त्यांचे डायलॉग्स आजही तितकेच लोकप्रिय आहेत. ‘दया, दरवाजा तोड दो’ सारख्या संवादांनी घराघरात पोहोचलेले हे पात्र आता ‘सीआयडी २’ मध्ये पुन्हा दिसणार आहे. नव्या मालिकेतील त्यांची भूमिका मुख्य नसेल, पण ते काही काळासाठी महत्त्वपूर्ण भागात दिसणार असल्याची माहिती दिली जात आहे.

CID 2
Samantha Ruth Prabhu: १५ मोठ्या ब्रँडना नकार, कोट्यवधींचं नुकसान; पण, समांथाला आजही नाही स्वतःच्या निर्णयांवर पश्चात्ताप

या नव्या पर्वात पार्थ समथान या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याला देखील एक महत्त्वाची भूमिका मिळाल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, पार्थ एका नव्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्याभोवतीच नवा कथानक केंद्रित असणार आहे. मात्र, शिवाजी साटम यांचे पुनरागमन ही एक 'सर्प्राईज एंट्री' म्हणून असणार आहे आणि त्यांच्या दृश्यांमुळे कथानकात एक वेगळा टर्न येणार आहे.

CID 2
Hit 3 Trailer Launch: सुपरस्टार नानीचा अ‍ॅक्शन अवतार; लवकरच येणार 'हिट ३' प्रेक्षकांच्या भेटीला

'सीआयडी २' मालिकेचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही मालिका आधीच्या सीआयडीचीच आधुनिक रूपात सादर केली जाणार असून त्यात नव्या तपास पद्धती, तंत्रज्ञान आणि वेगळा दृष्टीकोन पाहायला मिळणार आहे. मात्र, जुन्या चाहत्यांना खुश करण्यासाठी काही लोकप्रिय पात्रांना पुन्हा आणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com