अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली.
वयाच्या ४० व्या वर्षी सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला.
सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने 29 मार्चला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही गुडन्यूज सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. आता त्यांच्या बाळाची पहिली झलक समोर आली आहे.
सोनम कपूरच्या दुसऱ्या मुलाची झलक मावशी रिया कपूरने दाखवली आहे. तिने सोनम कपूरचा बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सोनम कपूर बाळाला हातात घेऊन त्याच्याकडे पाहताना, त्याला प्रेम करताना दिसत आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटो शेअर करत रियाने लिहिलं की, "तुम्हाला फक्त याचीच गरज असते...आणि सोनम कपूरच्या बाबतीत सांगायचे तर, आईची ती अलौकिक ताकद..." रिया कपूरने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा वर्षाव करत आहे. शुभेच्छा देत आहे. प्रेम व्यक्त करत आहेत.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 2018 ला लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्या मुलाचे वायू कपूर अहुजाचे स्वागत केले. सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. तसेच ती आपल्या फिटनेसकडे देखील विशेष लक्ष देते.
सोनम कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आजवर सोनम कपूरने अनेक हिट चित्रपट केले आहेत. यात आयशा, रांझणा, आय हेट लव्ह स्टोरी, निर्जा, संजू अशा चित्रपटांची नावे आहेत. तिला अनेक चित्रपटांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.