Bigg Boss फेम अभिनेत्याने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

Rajat Dalal Wedding : बिग बॉस फेम स्पर्धकाने लग्नगाठ बांधली आहे. बायकोसोबत फोटो शेअर करून त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली.
Rajat Dalal Wedding
Bigg Boss saam tv
Published On
Summary

बिग बॉस फेम अभिनेता लग्न बंधनात अडकला.

लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

लग्नातील रोमँटिक फोटो पाहा.

'बिग बॉस १८' फेम अभिनेता लग्न बंधनात अडकला आहे. 'द ५०' फेम रजत दलालने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. बायकोसोबतचे फोटो शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. रजत दलाल एक फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे. त्याने रविवारी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. रजत दलालने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते, मित्रमंडळी आणि कलाकार शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रजत दलाल नदीकिनारी लग्नगाठ बांधली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंना एक खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "जीवनाच्या एका नवीन टप्प्याची सुरुवात..." रजत दलालने एकूण चार फोटो शेअर केले. फोटोंमध्ये पार्श्वभूमीवर डोंगर आणि नदी दिसत आहे. रजत दलालने आपल्या बायकोचा हात धरला आहे. रजत दलाल पांढरी शेरवानीमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. डोक्यावर पगडी बांधली आहे. तर रजतच्या बायकोने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.

फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजूने फोटोंवर कमेंट केली की, "खूप खूप अभिनंदन, माझ्या भावा." मुनवर फारुकी याने लिहिले, "गाडीचा वेग नियंत्रित करणारी व्यक्ती आली आहे. माझ्या भावाला आणि वहिनीला खूप खूप अभिनंदन." , कशिश कपूरने लिहिले की, "तुमचं लग्न झालं. व्वा. अभिनंदन." चाहते दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अलिकडेच रजत दलाल 'द ५०' या शोमध्ये दिसला होता. त्याचा गेम चाहत्यांना खूप आवडला. 'बिग बॉस १८'मध्ये रजत दलाल त्याच्या रागीट स्वभावासाठी आणि काव्यशैलीसाठी ओळखला जात होता. 'द ५०' मध्ये रजत दलालचे नाव टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेसोबत जोडले गेले होते. मात्र, रजत दलालने गुपचूप तिच्याशी लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

Rajat Dalal Wedding
Sonam Kapoor : ४० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com