India vs Zimbabwe T20 WC: झिम्बाव्बेविरुद्ध धावांचा 'अभिषेक', तिलकचंही 'हार्दिक' अभिनंदन! चेन्नईत उभारला २५६ धावांचा डोंगर

T20 world Cup India vs Zimbabwe : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीत भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी बदल केले आहेत.
T20 world Cup  India vs Zimbabwe :
Abhishek Sharma and Hardik Pandya celebrate after powering India to a huge 256-run total against Zimbabwe in Chennai.saam tv
Published On
Summary
  • भारताने झिम्बाब्वेविरुद्ध २५६ धावांचा प्रचंड स्कोर उभारला.

  • अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्याची तडाखेबाज अर्धशतके.

  • सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत आज भारत आणि झिम्बाब्वेशी सामना होतोय. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होतोय. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपर-८मधील भारताचा हा दुसरा सामना असून यात भारतीय फंलदाजांनी धु्व्वाधार फटकेबाजी केली. अभिषेक शर्माच्या तडाखेबाज अर्धशतक त्यानंतर मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीनं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हार्दिकनं २३ चेंडूत ५० धावा केल्या. अभिषेक आणि हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २५६ धावा केल्या.

भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. सुरुवातीला फटकेबाजी करणाऱ्या संजू सॅमसन २४ धावांवर बाद झाला. ब्लेसिंग मुझाराबानीने त्याला झेलबाद केलं. इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान अभिषेकने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या विश्वचषकात अभिषेकने ५० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माला शुन्यावरच बाद झालाय.

भारताची दुसरी विकेट इशान किशन (३८ धावा) च्या रूपात पडली, जो सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर रिचर्ड नगारावाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माही टिनोटेंडो मापोसाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

अभिषेकने ३० चेंडूत ५५ धावा केल्या, त्यात चार षटकार आणि चार चौकार होते. कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत ३३ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकार होते. सूर्यकुमारला रिचर्ड नागरवाने बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com