

शिवापूर तालुक्यात पती-पत्नीने आयुष्य संपवलं
दोघांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नवरा-बायकोने आत्महत्या केल्याने दोन लहान मुले पोरकी
संजय महाजन, साम टीव्ही
जळगावच्या चाळीसगावमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवापूर तालुक्यात पती-पत्नीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दोघांच्या मृत्यूने दोन लहान मुले पोरकी झाली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या जोडप्याने शेतात एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरापासून सुमारे ३०० फूट अंतरावर शेतातील उंबराच्या झाडाला त्यांनी गळफास घेतला होता.
दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दांपत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने या घटनेवेळी घरी नव्हते.
दोघांच्या आत्महत्येमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली. नागपूरच्या हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्समध्ये घटना फ्लॅटमध्ये आयुष्य संपवलं. विध्येश्वरी आपटे (वय २३) मृत विद्यार्थीनीचे नाव आहे...ती मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. आकार नर्सिंग कॉलेजची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी मैत्रिणींसोबत फ्लॅटमध्ये राहत होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.