

खरात ‘हॉट-कोल्ड रिडींग’सारख्या मानसशास्त्रीय तंत्राचा वापर करत होता
महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना जाळ्यात ओढलं जात होतं
एसआयटी तपासात मोडस ऑपरेंडी उघड
वासनांध अशोक खरात. नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाते.कारण याच भोंदू अशोक खरातने तंत्र मंत्राच्या नावाने महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवलं. त्यासाठी खरात वापरत असलेली मोडस ऑपरेंडीची माहितीच साम टीव्हीच्या हाती लागलीय.
लिंगपिसाट खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हॉट रिडींग आणि कोल्ड रिडींगसारख्या मानसशास्त्रीय ट्रिक वापरायचा. भेटीच्या 5 मिनिटातच खरात समोरच्याला आयुष्याचा आरसा दाखवायचा. आणि त्याचा विश्वास जिंकायचा. आणि मग सुरू व्हायचा फसवणुकीचा सिलसिला.
मात्र खरात त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना गंडा घालण्यासाठी वापरत असलेली हॉट रिडींग आणि कोल्ड रिडींग पध्दत म्हणजे नेमकं काय? त्याविषयी माहिती घेतली असता चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या. मुळातच हॉट रिडींग ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. हीच संकल्पना वापरुन खरातने दोन टीम तयार केल्या होत्या.
समोरच्या व्यक्तीची भक्ताच्या नातेवाईकाकडून, सोशल मीडियावरुन खासगी माहिती गोळा केली जायची. याच माहितीच्या आधारे पहिल्या 5 मिनिटातच भविष्य सांगितल जायचं आणि त्याचा विश्वास बसायचा. तर कोल्ड रिडींग करताना पहिले काही प्रश्न विचारुन समोरच्याच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज घ्यायचा. समोरच्या व्यक्तीचं फेस रीडिंग, हावभाव, शारीरिक हालचाल, पेहराव, वय आणि संवादावरुन अंदाज घेत प्रश्न विचारायचा.
सायकॉलॉजीतल्या बार्नम इफेक्टचा खरात वापर करायचा. यात व्यक्त केलेला अंदाज चुकला तर तात्काळ दुसरा अंदाज व्यक्त केला जातो आणि अंदाज बरोबर आहे की नाही, हे जोर देऊन विचारलं जातं. त्यातूनच आपल्याला अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला जातो. खरातनं याच मानसशास्त्रीय ट्रिक वापरुन महिला आणि बड्या भक्तांना गंडा घातला. त्यांचा विश्वास मिळवत आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळे विधी करायला लावले. त्यातून विश्वास वाढला की त्यांना ऑफिसमध्ये बोलावून महिलांना गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार केले.
एवढंच नाही तर बड्या उद्योगपतींना गळाला लावत हनी ट्रॅपमध्ये अडकवायचा. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये खंडणी घ्यायचा. अशा पद्धतीने खरातने आपलं काळं साम्राज्य उभं केलं. मात्र खरात फाईल्स समोर आल्यानं या खरातच्या काळ्या साम्राज्याला सुरुंग लागलाय. आता खरातसारख्या विकृती मुळासकट उखडून टाकण्यासाठी पीडितांनी समोर येऊन खरातचे कारनामे उघड करायला हवेत. आणि सरकारनेही पुरावे गोळा करत खरातवर कठोरात कठोर कारवाई करायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.