अशोक खरातचा पाय आणखी खोलात
खरातची पोलीस कोठडी पुन्हा वाढवली
अधिकाऱ्यांनी मागितला तपासासाठी आणखी वेळ
भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्याची कोठडी ३ दिवसांनी वाढवण्यात आली आहे . नाशिक कोर्टात न्यायमूर्ती एम व्ही भराडे यांनी खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. आता खरातला 1 एप्रिलला कोर्टात हजर करावे लागणार आहे. या प्रकरणाचा आणखी तपास करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी अधिकचा वेळ मागितला होता.
तपास अधिकाऱ्याने कोर्टात सांगितले की, आरोपी तपासात सहकार्य करत नाही. मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्याचा तपास बाकी आहे. त्याने राजकीय व्यक्तींची नावे दुसऱ्याच्या नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झाला आहे. आरोपी विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर आहेत'.
सरकारी वकील कोर्टात म्हणाले की, 'आरोपी खरात मास्टर माईंड आहे.तपासात सहकार्य करत नाही. जंगम मालमत्ता आहे. त्याचा तपास करायचा आहे. पीडितांना पाणी द्यायचा, त्यात तो काय वापरायचा हे सांगत नाही. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. पीडित महिला येत आहे. तपासाची व्याप्ती वाढत आहे. डिजिटल माहिती घ्यायची आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करायचा असून संवेदनशील गुन्हा आहे. महिलांना फसविले आहे. त्याने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याला आणखी 3 दिवसांची पोलीस कस्टडी द्यावी'.
आरोपी वकील सचिन भाटे यांनी सांगितले की, 'पहिल्या रिमांडवेळी जी कारणे सांगितले, तिच कारणे आता सांगत आहे. मागच्या वेळी सांगितले त्यानुसार व्हिडिओ जप्त केले नाही. पेनड्राइव्ह जप्त का केला नाही ? कडवट द्रव्य पाजले हे सांगितले होते, आत्ताही तेच सांगत आहे. जंगम मालमत्ताबाबत मागच्या वेळी पण हेच सांगितले. त्यानुसार कोर्टाने पोलीस कोठडी दिली होती'.
'पैसे, लॅपटॉप, मोबाईल, काळ्या रंगाची पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि वापरलेले क्लोन कॉपी मिळालेली नाही. जप्त झालेली नाही तर पोलीस कोठडी कशी मागत आहे. तपासासाठी गरज आरोपी आणि कोर्टाची गरज नाही. वाढीव पोलीस कोठडीची गरज नाही, तो रद्द करावा, असे आरोपीचे वकील भाटे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.