

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अहिल्या नगरमध्ये तिघांविरोधात गुन्हा
पीडित महिलांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप
भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. भोंदू खरातने राज्यभरातील शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं आहे. परंतु खरातने केलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर काहींनी व्हायरल केल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी नगरमध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरात प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पोलिसांकडूनही खरातची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पीडित महिलांचेही व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर लैंगिक शोषण प्रकरणातील महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगावमधील राहुल शिंदे आणि योगेश आढाव याच्यासह बीडमधील संदीप गरजे या तीन जणांच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.
अहिल्यानगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने पाठवले. तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगावमधील संदीप गरजे याने हे व्हिडिओ पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आहे. व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपींची साखळीच या प्रकरणात पोलिसांनी केली. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवा धागा समोर आला आहे. हा धागा थेट राजकीय वर्तुळाशी जोडला जात आहे. अशोक खरातच्या वडिलांच्या २०१७ मधील दशक्रिया पत्रिकेचा फोटो व्हायरल झाला आहे. शोकाकुलांच्या यादीत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याची माहिती समोर आलीये. यामुळे खरात आणि चाकणकर यांच्यातील निकट संबंधांबाबत चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.