Maharashtra Live News Update: नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: अशोक खरात प्रकरण, अशोक खरातच्या प्रकरणाने राजकारण तापले, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, सातारा राडा प्रकरण, एकनाथ शिंदे, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam

Nashik: नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह

नाशिक -

- नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह

- रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

- आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला

- मंदिर गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट

- रामनवमीच्या निमित्ताने आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, तर भाविकांचीही दर्शनासाठी मोठी गर्दी

Nagpur: नागपूर शहरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगरातून भव्य शोभायात्रा निघणार

नागपूर -

- शहरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगरातून भव्य शोभायात्रा निघणार.

- शहरात साडेतीन हजारांहून अधिक पोलीस आणि होमगार्ड तैनात.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, होणार सहभागी...

- सुरक्षा पथकात २०० अधिकारी, २००० पोलीस अंमलदार, १,४०० होमगार्ड जवान राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी सज्ज.

- संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार.

- गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरासह ड्रोनच्या सहाय्याने आकाशातूनही पाळत ठेवली जाणार.

- संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश

- मिरवणूक संपेपर्यंत सर्व यंत्रणा घटनास्थळी तैनात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

Kolhapur: महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर -

"मराठेशाहीचा इतिहासकार हरपला"

महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार

यांचे निधन

आज पहाटे त्यांचे झाले दुःखद निधन झाले.

निधनासमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते

गेल्या अनेक दिवस एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सुरू होते उपचार

Pune: पुणे शहरातील बांधकामाच्या वेळेवर निर्बंध, सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेळ निश्चित

पुणे -

शहरातील बांधकामाच्या वेळेवर निर्बंध सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेळ निश्चित

रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय

रात्री होणाऱ्या बांधकामामुळे आणि धुळीमुळे दोन्ही प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आल्याने निर्णय

सकाळी लवकर आणि रात्री उशिरा होणाऱ्या बांधकामामुळे हवा दोन्ही प्रदूषणात अधिक वाढ होत आहे

महापालिकेच्या बांधकाम विभागाने वेळेचे निर्बंध लागू केले आहेत त्यामुळे आता बांधकाम सकाळी लवकर आणि रात्री उशिरा करता येणार नाही

Pune: आरटीओचा भोंगळ कारभार समोर ई वाहनधारकांना कर भरण्याच्या नोटीस

पुणे -

आरटीओचा भोंगळ कारभार समोर ई वाहनधारकांना कर भरण्याच्या नोटीस

एसएमएस द्वारे चकित मोटार वाहन कर भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत

राज्य सरकारच्या धोरणानुसार ई वाहनांना 2030 पर्यंत करातून पूर्ण माफी असतं नाही नोटीसा पाठवल्याने संभ्रम

नोटीसा चुकून आल्याने ई वाहनधारकाने याकडे दुर्लक्ष करावे असं आवाहन चूक लक्षात आल्यानंतर आरटीओने केला आहे

Gadchiroli: आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल टंचाई, गडचिरोलीत पेट्रोलपंपाबाहेर वाहनांच्या रांगा

गडचिरोली -

आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल टंचाई

गडचिरोली जिल्ह्यातील येनापुर येथील पेट्रोल पंपासमोर दोन किलोमीटरपर्यंत डिझेल भरण्यासाठी ट्रकची लागली रांगच

वाहतूक ठप्प झाल्यामुळे आष्टी पोलिसांनी येऊन वाहतूक केली सुरळीत

Nanded: नांदेडमध्ये पेट्रोल-  डिझेलचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका;  जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

नांदेड -

नांदेड जिल्हात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा

नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये

अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com