Shivali Parab Movie Poster Released
Shivali ParabSAAM TV

Shivali Parab : शिवाली परब झळकणार मोठ्या पडद्यावर, कोणता चित्रपट घेऊन येतेय?

Shivali Parab Movie Poster Released : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले.
Published on

महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे शिवाली परब (Shivali Parab) प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आणि आपलीशी झाली. तिला महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे लोकप्रियता मिळली. आपल्या अभिनयाने आणि धमाल कॉमेडीने शिवालीने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.

सध्या शिवाली तिच्या आगामी चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शिवालीच्या आगामी चित्रपटाचे नाव 'मंगला' आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रत्येकाला हसवणारी शिवाली चित्रपटात कोणती भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच ती या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. शिवालीचा मोठ्या पडद्यावरील अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सर्वांना हसवणारी शिवाली गंभीर भूमिका कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नुकतेच शिवालीने लालबागच्या (Lalbaugcha Raja) राजाचे दर्शन घेतले असून गणरायाच्या चरणी तिने आगामी सिनेमाचे पोस्टरही रिलीज केले. शिवालीचा 'मंगला' (Mangla ) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवालीच्या या चित्रपटात ग्रामीण पार्श्वभूमी असल्याचे पोस्टर पाहून समजत आहे. यासंबंधित सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

'मंगला' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शिवालीचे तीन लूक पाहायला मिळत आहेत. मंगला नावाच्या गायिकेच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. तिच्यावर ॲसिड हल्ला होतो मग तिच्या वाट्याला येणारा खडतर प्रवास चित्रपटातून व्यक्त केला आहे. 'मंगला' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी सांभाळली आहे. शिवालीने यापूर्वीही अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाची अद्यापही रिलीज डेट समोर आली नाही आहे.

Shivali Parab Movie Poster Released
Ankita Lokhande : अंकिताने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ, इंटरनेटवर तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com