PKL 2024 : पुणेरी पलटण लालबागच्या राजाच्या चरणी, PKL ट्रॉफीसह घेतलं लाडक्या बाप्पाचं दर्शन, PHOTO

Puneri Paltan At Lalbaugcha Raja: पुणेरी पलटण संघाने लालबागच्या राजाच्या चरणी हजेरी लावली आहे.
PKL 2024 : पुणेरी पलटण लालबागच्या राजाच्या चरणी, PKL ट्रॉफीसह घेतलं लाडक्या बाप्पाचं दर्शन, PHOTO
pro kabaddisaam tv
Published On

प्रो कबड्डी लीगचे(पीकेएल) ११ वे हंगाम येत्या १८ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होत आहे. ही स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पुणेरी पलटण संघातील कबड्डीपटूंनी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अशा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

PRO KABADDI
PRO KABADDI SAAM TV

गणेश उत्सवाचे महत्व ध्यानात घेऊन पुणेरी पलटण संघातील कर्णधार अस्लम इनामदार, आकाश शिंदे आणि पंकज मोहिते या तीनही खेळाडूंनी जगप्रसिद्ध अशा लालबागचा राजा मंडळाला भेट दिली. या खेळाडूंनी गणेशाचे दर्शन घेतले आणि प्रो कबड्डी लीगच्याअकराव्या मोसमात गतविजेतेपद राखण्यासाठी श्री गणेशाचे आशीर्वाद घेतले.

शनिवार ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेला गणेशोत्सव १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत चालणार आहे. या तीनही कबड्डी पटूंनी लालबागचा राजा गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो गणेश भक्त आणि कबड्डी प्रेमींच्या बरोबर व प्रो कबड्डी लीग विजेतेपदाच्या करंडकासह अनेक छायाचित्रेही काढली व चाहत्यांना खुश केले.

PKL 2024 : पुणेरी पलटण लालबागच्या राजाच्या चरणी, PKL ट्रॉफीसह घेतलं लाडक्या बाप्पाचं दर्शन, PHOTO
PKL Season 11: प्रो कबड्डीचं वेळापत्रक जाहीर! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? पाहा एकाच क्लिकवर

पुणेरी पलटण संघाचा कर्णधार अस्लम इनामदार यावेळी म्हणाला की, 'जगप्रसिद्ध अशा लालबागचा राजा मंडळाच्या गणेशाचे दर्शन घेऊन गणेश चतुर्थी साजरी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मी लहानपणी इथे आलो होता. हा अदभूत अनुभव आज मी पुन्हा एकदा घेतला. हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला पाहिजे, माझ्या संघ सहकाऱ्यांबरोबर गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी गणपतीचे आशीर्वाद घेतल्यामुळे मी भारावून गेलो आहे.'

PKL 2024 : पुणेरी पलटण लालबागच्या राजाच्या चरणी, PKL ट्रॉफीसह घेतलं लाडक्या बाप्पाचं दर्शन, PHOTO
PKL 2024: प्रो कबड्डी स्पर्धेची तारीख ठरली! या 3 शहरात रंगणार सामने


प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामाला हैदराबाद येथील गच्चीबाउली स्टेडियम येथे तेलगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सच्या लढतीने सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला १८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात होणार आहे. प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टसच्या वाहिन्यांवर पाहता येणार आहे. तसेच डिस्ने प्लस हॉट स्टारवर त्याचे थेट स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com