PKL Season 11: प्रो कबड्डीचं वेळापत्रक जाहीर! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? पाहा एकाच क्लिकवर
pro kabaddisaam tv

PKL Season 11: प्रो कबड्डीचं वेळापत्रक जाहीर! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? पाहा एकाच क्लिकवर

Pro Kabaddi Season 11 Time Table: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर
Published on

प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर रोजी सुरू होत असून तेलगु टायटन्स विरुध्द बेंगळुरू बुल्स यांच्यात हैदराबाद येथे होणाऱ्या सलामीच्या लढतीने स्पर्धेला प्रारंभ होत असल्याचे लीगचे संयोजक मशाल स्पोर्टस यांनी जाहीर केले. तेलगु टायटन्सचा स्टार चढाई पटू पवन सेहरावत आणि बेंगळुरू बुल्सचा परदीप नरवाल यांच्यातील झुंज या लढतीचे खास आकर्षण ठरणार आहे.

तर स्पर्धेतील दुसऱ्याच लढतीत यु मुंबा आणि दबंग दिल्ली केसी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. गेली काही वर्ष प्रत्येक संघाला आपल्या होम ग्राऊंडवर खेळण्याची संधी दिली जात होती. मात्र यावेळी या स्पर्धेचे आयोजन केवळ ३ शहरांमध्ये केले जाणार आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान हैदराबादच्या गच्ची बाऊली इंडोर स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे.

PKL Season 11: प्रो कबड्डीचं वेळापत्रक जाहीर! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? पाहा एकाच क्लिकवर
PKL 2024: प्रो कबड्डी स्पर्धेची तारीख ठरली! या 3 शहरात रंगणार सामने

तर स्पर्धेचे दुसरे सत्र १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दरम्यान नोएडा इंडोर स्टेडियम येथे होणार आहे. तर, तिसरे सत्र पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम येथे ३ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेच्या प्ले ऑफच्या लढतीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. हा लिलाव ऐतिहासिक ठरला. कारण यावेळी खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागली. यंदा ८ खेळाडूंवर १ कोटींपेक्षा अधिकची बोली लागली. हा लिलाव सोहळा १५ आणि १६ ऑगस्ट रोजी पार पडला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com