Ankita Lokhande : अंकिताने शेअर केला रोमँटिक व्हिडिओ, इंटरनेटवर तुफान व्हायरल

Ankita Lokhande Vicky Jain Romantic Photoshoot : बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत रोमँटिक फोटोशूट केले आहे. त्यांच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Ankita Lokhande Vicky Jain Romantic Photoshoot
Ankita LokhandeSAAM TV
Published On

टीव्हीतून पदार्पण करून बॉलिवूडमध्ये आपली जागा निमार्ण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि नवऱ्यासोबतचे व्हिडिओ तसेच आपल्या कामासंबंधित ती नेहमी शेअर करत असते. आता अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंकिता लोखंडेने आपल्या सोशल मीडियावर पती विकी जैनसोबतची (Vicky Jain) एक खास पोस्ट केली आहे. तिने एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विकीसोबत रोमँटिक फोटोशूट करताना पाहायला मिळत आहे. या जोडप्याचे फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दोघही फोटोशूटमध्ये एकमेकांच्या प्रेमात बुडालेले पाहायला मिळत आहेत.

अंकिता विकीसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. अंकिताने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे तर विकीने पांढरा टी-शर्ट, मॅचिंग ब्लेझर आणि ट्राउझर्स परिधान केले आहे. दोघही यात खूप क्लासी दिसत आहेत. अंकिताने नॅचरल मेकअपसोबत केसांची पोनीटेल बनवली आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. अंकिता तर बाथटबमध्ये पोज देताना देखील दिसत आहे.

अंकिताने या रोमँटिक रीलला हटके कॅप्शन दिले आहे. की, "We wrote ‘Hot and Sassy’ as our middle names.' अंकिताच्या या रोमँटिक अंदाजातील व्हिडिओ अनेक लाइक आणि कमेंट्स येत आहेत. चाहत्यांना ही रील खूप आवडली आहे.

अंकिता 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबईत बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. अंकिताने 2009 मध्ये 'पवित्र रिश्ता' या शोमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निमार्ण केली. तिला या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली.

Ankita Lokhande Vicky Jain Romantic Photoshoot
Devara Part 1 Trailer: ज्युनिअर एनटीआरचा भयानक अवतार, सैफ अली खानची खास झलक; 'देवरा'चा ट्रेलर पाहिलात का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com