रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या पार्टनरसोबत कॉलिटी टाईम सर्वांनाच हवा असतो. अनेक कपल्स यासाठी जागा शोधत असतात. मुंबईत असे अनेक हिडन स्पॉट आहेत. ती ठिकाणे कुठे आहेत? कसे जायचे याची संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत.
आपल्या पार्टनसोबत मनसोक्त फिरण्यासाठी आणि कॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह सर्वात खास आहे. येथे तुम्ही पार्टनरसोबत मनसोक्त फिरू शकता आणि एन्जॉय करू शकता. दक्षिण मुंबईत असलेला हा एक सी शेप रोड आहे. समोर असलेल्या समुद्राच्या लाटा यामुळे रात्री हा परिसर आणखी सुंदर दिसतो.
वांद्रे रेल्वे स्थानकात उतरून तुम्ही बँडस्टँडला पोहचू शकता. येथे सुंदर 1.2 लिकोमिटरपर्यंतच्या जागेत तुम्ही मनसोक्त फिरू शकता. पार्टनरसोबत फिरताना याठिकाणी खडकांवर आदळणाऱ्या पाण्याच्या लाटा तुम्हाला पाहायला मिळतील. समुद्रावर असलेला हा परिसर फारच नयनरम्य आहे.
वर्सोवा समुद्रकिनारी जायचे असल्यास तुम्हाला अंधेरी रेल्वे स्थानकात आधी यावे लागेल. येथे आल्यावर टॅक्सी करून तुम्ही वर्सोवा बीचपर्यंत पोहचू शकता. वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 2.7 किलोमिटर अंतरावर लांब खडक आहेत. ही जागा नेहमी जोडप्यांनी खचाखच भरलेली असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा येथे तुमच्या पार्टनरसोबत एन्जॉय करू शकता. तसेच सुदंर सूर्यास्त पाहू शकता.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर मुंबईमध्ये आहे. हे उद्यान 104 किलोमिटर परिसरात पसरलेले आहे. येथे सुंदर तलाव, गर्द झाडी, विविध पशी पाहायला मिळतात. कपल्सना फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
मलबार हिल परिसरात सर्वात वरती हँगिंग गार्डन आहे. 1880 मध्ये हे गार्डन बांधण्यात आलं आहे. येथून तुम्हाला भव्य अरबी समुद्र पाहता येईल. पावसाळ्यात हे गार्डन आणखी नयनरम्य दिसते. तलाव असल्याने येथे तुम्हाला काही मासे आणि कासव सुद्धा पाहता येतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.