Shraddha Thik
मालवण फिरायला जाणारे बहूतेकजण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातात.
सिंधुदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. आणि 1695साली राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले आहे.
किल्यामध्ये प्रवेश केल्यावर महाद्वाराच्या उजव्या बाजूलाच दोन दिवळ्या आहेत.
या सिंधुदूर्ग किल्ल्याच्या एका दिवळीत शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा ठसा अजूनही आहे.
आणि एका दिवाळीत महाराजांचा उजव्या हाताचा ठसा आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर दही बाव, दुध बाव आणि साखर बाव या गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत, त्यांना नक्की भेट द्या.