Delhi News : दोन मुलं मृतावस्थेत,आई रक्ताच्या थारोळ्यात; दिल्लीतील शशी गार्डन परिसरात नेमकं काय घडलं?

Delhi Crime News : राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शनिवारी पूर्व दिल्लीतील शशी गार्डन परिसरात दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. मृत मुलांसोबत एक महिलाही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, ही महिला मुलांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे.
Delhi News
Delhi News Saam Digital

राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शनिवारी पूर्व दिल्लीतील शशी गार्डन परिसरात दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. मृत मुलांसोबत एक महिलाही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, ही महिला मुलांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २ वाजता शशी गार्डन परिसरात ४२ वर्षीय श्यामजी बेपत्ता झाल्याची माहिती पीसीआरला मिळाली होती. शुक्रवारपासून घराला कुलूप असल्याचे फोनवरून ही माहिती देण्यात आली होती.पोलिसांनी ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला, मात्र त्यांचं घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं.

दरवाजा उघडल्यानंतर खोलीत दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं. यात १५ आणि ९ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर त्यांची आई जवळच रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणि बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तात्काळ दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखलं केलं.

Delhi News
Mumbai News: गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी, लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

बेपत्ता श्यामजीचा अद्याप शोध लागला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस त्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. गुन्हे शाखेची टीम आणि एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर दिल्लीत खळबळ उडाली.

Delhi News
Mumbai Crime News: नात्याला काळिमा, घरातील एकट्या तरुणीवर पडली वाईट नजर; सावत्र आजोबाने केलं संतापजनक कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com