Mumbai News: गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी, लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Mumbai Crime News: गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी १० लाखांची मागणी करणारा दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी, लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Dahisar Police StationSaam Tv
Published On

Mumbai Crime News:

>> संजय गडदे

गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी १० लाखांची मागणी करणारा दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईत दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे याच्यासह लाचेच्या रक्कमेपैकी एक लाख स्वीकारणारा खाजगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा या दोघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी, लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Pune Crime News : पोलीसांची धाड, तो जीव मुठीत घेऊन पळाला; इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पाय घसरला अन् मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे बँक खाते गोठवण्यात आले. यासंदर्भात तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँक कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना दहिसर पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी गुहाडे यांना संपर्क करून भेट घेतली, त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी दहा लाख रुपये देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर यासाठी पाच लाख रुपये इतकी तडजोड केली. यानंतर तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी एसीबी कार्यालयात या संदर्भात तक्रार केली.

गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी, लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Crime News : बीडसह मावळमध्ये बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर कारवाई, लाखाेंचा मुद्देमाल हस्तगत

तक्रार अर्जाच्या पडताळणी नंतर पोलीस उपनिरीक्षक गुहाडे यांनी तडजोडी अंती ३ लाखाची मागणी करून खासगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा याच्यामार्फत लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाईत मिश्रा हा मागणी केलेल्या रक्कमेपैकी १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ मिळून आला. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com