

Shahid Kapoor latest news : पुण्यात अभिनेता शाहिद कपूरला धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमाननगरमधील एका मॉलमध्ये चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाहिद कपूरसह अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना देखील उपस्थित होत्या. मात्र, आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी अनियंत्रित गर्दी केल्यामुळे मॉलमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि कलाकारांना धक्काबुक्की सहन करावी लागली.
अभिनेता शाहिद कपूरला पुण्यातील एका मॉलमध्ये धक्काबुक्की झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. विमाननगर परिसरातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मॉलमध्ये या कार्यक्रमासाठी शाहिद कपूरसोबत अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना देखील उपस्थित होत्या. आपल्या लाडक्या बॉलिवूड कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांनी मॉलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. मात्र, ही गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे मॉलमध्ये मोठा गोंधळ उडाला. या अनागोंदी परिस्थितीमुळे सुरक्षारक्षकांचा ताबा सुटला आणि तिथे उपस्थित कलाकारांना धक्काबुक्की सहन करावी लागली.
सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र अशा सार्वजनिक कार्यक्रमांमधील सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा आणि गर्दीच्या नियोजनाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान शाहीद कपूर, कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांचा कॉकटेल 2 चित्रपट रिलीज होणार आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर पुण्यात आला होता, त्यावेळी धक्काबुक्की झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.