Samantha Ruth Prabhu Viral Statement
Samantha Ruth Prabhusaam tv

Samantha Ruth Prabhu : जेवण की सेक्स? समांथाच्या बोल्ड उत्तराने चाहते बुचकळ्यात, जुना व्हिडिओ व्हायरल

Samantha Ruth Prabhu Viral Statement : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तिचे एक वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Published on

साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ज्यामुळे तिचे मानसिक आरोग्य देखील बिघडले होते. याचा खुलासा समांथाने अनेक मुलाखतींमध्ये केला होता. आता नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी लग्नगाठ बांधून नवीन संसार थाटला आहे.

समांथा रुथ प्रभू हिच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय, कारण तिने दिलेले बोल्ड उत्तर होय. शरीरसंबंध की जेवण, तू कशाला प्राधान्य देशील, असा प्रश्न समांथाला त्या शो मध्ये विचारण्यात आला होता. त्यावर समांथाने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच चकीत केले. समंथा म्हणाली की, 'मी अन्नाशिवाय कदाचित एक दिवस उपाशी राहीन पण..." समांथाने दिलेल्या बोल्ड उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत कोणताही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण नेटकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ चर्चेचा विषय आहे.

समांथाने दिलेल्या उत्तरानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट तयार झाले. काहींनी समांथाच्या बोल्ड उत्तराचे कौतुक केले, तर काहींनी तिला प्रचंड ट्रोल केले. समांथा रुथ प्रभूच्या म्हणण्यांनुसार अन्न आणि सेक्स दोन्ही महत्त्वाचे आहेत. निरोगी राहण्यासाठी चांगले अन्न खावे आणि वैयक्तिक वाढ आणि मानसिक आरोग्यासाठी शारीरिक संबंध देखील महत्त्वाचे असतात.

अलिकडेच समांथा रुथ प्रभून 'सिटाडेल: इंडिया' या वेब सीरिजमध्ये झळकली होती. यात तिने बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत काम केले आहे. समांथा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिच्या वेगवगेळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिचे इन्स्टाग्राम 37.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Samantha Ruth Prabhu Viral Statement
Anurag Kashyap : लोक मूर्ख नाहीत...,'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप संतापला, म्हणाला- भारतात जातीवाद ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com