Rupali Chakankar : रुग्ण ५ तास हॉस्पिटलमध्ये, रक्तस्त्राव सुरुच होता, तनिषा भिसेंचं मानसिक खच्चीकरण; चाकणकरांनी सगळंच सांगितलं

Rupali Chakankar on Dinanath Mangeshkar Hospital : भिसे कुटुंबीयांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी एक लेखी पत्र देखील दिलं आहे. आज यासंदर्भात बैठक पार पडली.
Rupali Chakankar on Deenanath Mangeshkar Hospital
Rupali Chakankar on Deenanath Mangeshkar HospitalSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने देखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात आली.

भिसे कुटुंबीयांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी एक लेखी पत्र देखील दिलं आहे. आज यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. यावेळी दीनानाथ रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रूग्णालय जबाबादार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याबाबत दीनानाथ रूग्णालयाला समज देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

Rupali Chakankar on Deenanath Mangeshkar Hospital
Rohit Pawar : रोहित पवारांना होमग्राऊंडवर हादरा, कर्जतमधील सत्ता जाणार, राम शिंदेंनी डाव टाकला

पत्रकार परिषदेत बोलताना यावेळी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजाराबाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. रुग्ण आणि नातेवाईक २८ मार्चला नऊ वाजता रुग्णालयात गेल्यावर १० लाख रुपयांची मागणी केली. अडीच वाजता रुग्ण मंगेशकर रुग्णालयातून बाहेर पडला. साडेपाच तासात रूग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतीही उपचार केले नाहीत. त्याउलट त्यांना त्यांच्याजवळ असलेली गोळी घेण्याचा सल्ला दिला. रूग्णांच्या नातेवाईकांचा दावा आहे की, मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचं सांगितलं. शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र, पैसे वेळेत भरु न शकल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झालं, रूग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक होतं, त्यांनी उपचार करणं गरजेचं होतं, पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती चाकणकरांनी दिली आहे.

Rupali Chakankar on Deenanath Mangeshkar Hospital
Beed Crime : गावातील प्रगतशील शेतकरी, लेकरांचं अन् कर्जाचं टेन्शन; बीडमध्ये तरुण शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com