
योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही अंतर्गत असलेल्या रायतेवाडी येथील तरुण शेतकरी दत्ता संतराम रायते (वय ४४) हे कर्जबाजारी झाल्याने विवंचनेत सापडले. याच वैफल्यातून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी रोजी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही अंतर्गत येत असलेल्या रायतेवाडी येथील तरुण शेतकरी सध्या चुंभळी शिवारात जळकेवाडी क्षेत्रात आपल्या कुटुंबासह वास्तव्यात होता. तो शेती व ऊसतोडणीवर उदरनिर्वाह चालवत असे. नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने तो विवंचनेत होता. मुलांचे कसे होईल? याच आशेवर जगत असलेला हा शेतकरी होता. याच वैफल्यातून त्याने आज सोमवारी रोजी पहाटे घराच्या दरवाजाला गळफास लावून आपलं जिवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाठी पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दत्ता संतराम रायते हा गावातील चांगला प्रगतशील शेतकरी होता.
पुण्यात प्रेमातील वादाचा दुर्दैवी अंत
दरम्यान, काल पुण्यातील एका विवाहित प्रेमी युगुलाने आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे डिंभे धरणाच्या कालव्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. विवाहबाह्य नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रेमाचं हे दुःखद रूप पाहून परिसरात खळबळ उडाली असून, दोघांनी पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानं टाकेवाडीतील कालवा त्यांच्या प्रेमाचा शेवटचा साक्षीदार ठरला.
खेड तालुक्यातील जऊळुके गावातील विवाहित प्रेमी युगुलाने विवाहबाह्य संबंधातील वादातून डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना टाकेवाडी (ता.आंबेगाव) परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.