Sanjay Raut: अमेरिकेत जे घडलं ते भारतातही घडणार, मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का? संजय राऊतांना शंका

Sanjay Raut Criticized PM Narendra Modi: अमेरिकेतील नागरिक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरत ते आंदोलन करत आहेत. या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
Sanjay Raut: अमेरिकेत जे घडलं ते भारतातही घडणार, मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का? संजय राऊतांना शंका
Sanjay Raut Slams PM Narendra Modi: Saamtv
Published On

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकेतील जनता आक्रमक झाली आहे. रस्त्यावर उतरून अमेरिकन नागरिक आंदोलन करत आहेत. अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'अमेरिकेत जे घडलं ते भारतातही घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का?' यात मला शंका वाटते.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी अमेरिकेत घडत असेलल्या घडामोडींवर प्रतिक्रिया देत असताना सांगितले की, 'अमेरिकेच्या जनतेचे त्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जसं दिसल तसं आता अमेरिकेत दिसत आहे. अमेरिकेच्या ५० राज्याची जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अडाणी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचा स्पोर्ट होण्याची शक्यता आहे आणि ते होणार आहे. हा देश विकला जात आहे तसा हा देश मोदी आणि अमित शहा यांना विकला जात आहे ही वक्फ बोर्ड त्याची एक महत्त्वाची पायरी आहे.'

Sanjay Raut: अमेरिकेत जे घडलं ते भारतातही घडणार, मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का? संजय राऊतांना शंका
PM Narendra Modi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षय वट; नरेंद्र मोदींचे नागपुरात गौरवाद्गार, VIDEO

तसंच, 'या देशात सुद्धा गावागावांमध्ये रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही. उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळे तोच हस्तक्षेप करू शकतो. या देशात चार उद्योगपती आहेत ते देश चालवत आहेत. हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्या सोयीने धोरण बदलली जात आहेत. कामगार कायदे बदलले जात आहेत हे त्यांच्यासाठीच आहेत. उद्या ट्रम्पच्या वाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकावलं तरी आश्चर्य वाटणार नाही. या देशात सुद्धा तेच घडणार आहे. म्हणून मी वारंवार बोलत आहे नरेंद्र मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का? यात मला शंका वाटते.', असं मत व्यक्त करत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.

Sanjay Raut: अमेरिकेत जे घडलं ते भारतातही घडणार, मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का? संजय राऊतांना शंका
PM Narendra Modi: PM मोदींचा नागपूर दौरा, हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन; स्वागत फलकांनी वेधलं लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com