Anurag Kashyap : लोक मूर्ख नाहीत...,'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप संतापला, म्हणाला- भारतात जातीवाद ...

Phule Movie Controversy : 'फुले' चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशात आता अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
Phule Movie Controversy
Anurag KashyapSAAM TV
Published On

सध्या 'फुले' (Phule ) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. 'फुले' चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. सध्या हा चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटात महात्मा फुले यांच्या भूमिकेत प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पत्रलेखा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला आहे. यामुळे चित्रपटाच्या रिलीजला अडथळे येत आहेत.

आता 'फुले' चित्रपटाच्या वाद सुरू असताना बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पोस्ट शेअर करून आपले मत मांडले आहे. त्यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डाला खडेबोल सुनावले आहे. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात.

अनुराग कश्यपने पोस्ट

'धडक 2'च्या स्क्रीनिंगमध्ये सेन्सॉर बोर्डाने सांगितले की, मोदीजींनी भारतातील जातिव्यवस्था संपवली आहे. त्यामुळे 'संतोष' हा चित्रपट देखील भारतात रिलीज झाला नाही. आता ब्राह्मण समाजाला 'फुले' चित्रपटावर आक्षेप आहे. पण जर आता जातिव्यवस्थाच नाही तर कसला ब्राह्मण? कोण आहात तुम्ही? तुम्हाला कसला त्रास होतोय. जर जातिव्यवस्था नव्हती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले का होते? म्हणजे तुमचा ब्राह्मणवाद अस्तित्वात नाही. कारण मोदींच्या मते भारतात जातिव्यवस्था नाही? तुम्ही सगळे मिळून सगळ्यांना मूर्ख बनवत आहात. भारतात जातीवाद आहे की नाही, हे तुम्ही सगळे मिळून ठरवा. लोक मूर्ख नाहीत.

'फुले' चित्रपटाच्या वादमुळे सिनेमाची रिलीज डेट देखील पुढे ढकलण्यात आली आहे. 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली आहे. 'फुले' चित्रपट अनंत महादेवन दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या वादामुळे 'फुले' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून 25 एप्रिल करण्यात आले आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी आतुर असल्याचे दिसत आहे.

Phule Movie Controversy
Soha Ali Kha : राजवाडा सोडला अन् पतौडी पॅलेसमध्ये धावले, सोहाने सांगितला भुतांचा भयानक किस्सा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com