

Raja Shivaji : सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या अभिनेत्याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये अनेक अभिनेत्यांनी ऐतिहासिक भुमिका उत्तम रित्या पार पाडल्या आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु आहे. यामध्ये ज्यासाठी चाहत्यांची उत्सुकता होती, त्याचं सत्य समोर आलं आहे.
'राजा शिवाजी' या चित्रपटात अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान कैमिओ करणार याच्या चर्चा सर्वत्र सुरु होत्या. शिवाय अभिनेता रितेश देशमुखनेही याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याच्या पात्राबद्दल उत्सुकता वाढली होती. आता चित्रपट गृहात 'राजा शिवाजी' प्रदर्शित झाला आहे. त्यामधील सलमान खानची भुमिका आणि त्याचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता सलमानने चित्रपटातील पात्रामध्ये डोक्यावर फेटा, केशरी रंगाचा अंगरखा, अंगावर कुर्ता, हातात तलवार अशी 'जीवा महालाची' भूमिका साकारली आहे. या वेशभुषेत त्याने दमदार एन्ट्री घेतल्याचं चित्रपटात पाहायला मिळालं आहे. तसेच त्याच्या शेजारी छ. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला रितेश देशमुख उभा असल्याचंही पाहायला मिळालं आहे.
सलमान खानचा या चित्रपटातला एक डायलॉग सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून तुफान व्हायरल होत आहे. तो म्हणजे, ''शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं...'' यावर थिएटरमध्ये प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याचे कौतुक करत आहेत. तर हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीतला सर्वात मोठा म्हणजे १०० कोटींचे बजेट असलेला चित्रपट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.