Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला तुमच्या पीफचे पैसे काढायचे असतील तर तुम्ही KYC करणं गरजेचं आहे.
एक खुशखबर म्हणजे आता EFPO च्या कर्मचाऱ्यांना पीफ काढण्यासाठी सतत कार्यालयात जाऊन रांगा लावायची गरज नाही.
तुम्ही आता ATMच्या मदतीने म्हणजेच डिजीटल प्रणालीचा वापर करुन पीफचे पैसे काढू शकता. पण त्यासाठी KYC अपडेट करावी लागेल. त्याच्या सोप्या पायऱ्या पुढील बातमीत दिल्या आहेत.
सर्वप्रथम अधिकृत EPFO वेबसाइटवर जाऊन KYC Updation (Member) पर्याय निवडा.
तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड वापरून Member e-Sewa पोर्टलमध्ये साइन-इन करा.
होमपेजवर ‘Manage’ टॅबवर क्लिक करून ‘KYC’ ऑप्शन निवडा.
Bank पर्यायावर क्लिक करून नवीन बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाका.
आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून बँक डिटेल्स सबमिट करा. त्यानंतर PAN नंबरही OTP द्वारे व्हेरिफाय करा.
KYC सबमिट केल्यानंतर स्टेटस ‘Pending with Employer for digital signing’ दिसेल. कंपनीने अप्रूव्ह केल्यावर तुमचं KYC अपडेट पूर्ण होईल.