जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला सैराट फेम रिंकू राजगुरुनने हजेरी लावली होती. या महोत्सवात रिंकूची झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. जळगावमधील कार्यक्रमानंतर रिंकू निघाली, त्यावेळी चाहत्यांचा धक्का रिंकू राजगुरूला लागला. यामुळे रिंकू चाहत्यांवर चांगलीच भडकली. रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
जळगाव येथे शासनाच्या वतीने आयोजित संस्कृती महोत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित राहिली. या सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दी दरम्यान रिंकू राजगुरुला धक्काबुक्की झाल्याने चाहत्यांवर भडकली. 'तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का? अशा शब्दात रिंकू राजगुरूने चहात्यांना खडेबोल सुनावले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जळगावमधील या कार्यक्रमात रिंकूने 'सैराट' सिनेमातील डायलॉग बोलून दाखवला. तिने खान्देशी भाषेत डायलॉग बोलून दाखवला. खान्देशी भाषेत डायलॉग बोलल्यानंतर चाहत्यांनी एकच कल्ला केला.
अभिनेत्री रिंकू राजगुरूला 'सैराट' सिनेमाने आयुष्य बदललं. या सिनेमाच्या वेळी रिंकू फक्त १५ वर्षांची होती. तिला एका सिनेमाने यशाच्या शिखरावर नेलं. सैराट सिनेमानंतर रिंकू इतर सिनेमातही दिसली. त्या सिनेमातही रिंकूने अभिनयाची दमदार झलक दाखवली. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' सिनेमातही रिंकूने काम केलं.
या सिनेमातील तिच्या अभिनयाने चाहत्यांची चांगलीच मने जिंकली होती. या सिनेमात रिंकू ही अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासोबत दिसली होती. निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरुची जोडी ही तिच्या चाहत्यांना खूपच भावली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.