Republic Day Song : 'ए मेरे वतन के लोगों' ते 'माँ तुझे सलाम'; प्रजासत्ताक दिनाची प्ले लिस्ट आताच ठरवा, 'ही' १० गाणी असायलाच हवी

Patriotic Hindi Songs : प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रध्वजाला वंदन करताना आवर्जून हिंदी देशभक्तीपर गाणी लावा. मधुर गाण्यांची यादी आताच नोट करा.
Patriotic Hindi Songs
Republic Day Songsaam tv
Published On
Summary

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रध्वजाला वंदन करतात.

कार्यक्रमांमध्ये आवर्जून भक्तीपर गाणी लावली जातात.

उद्या (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिन भारत देश या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य होय. या दिवशी आकाशात आपला तिरंगा फडकवतात.

राष्ट्रध्वजाला वंदन करतात. या दिवशी प्रत्येकजण देश भक्तीत पाहायला मिळतो. या दिवशी आपण शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहतो. नागरिक सकाळी आपल्या सोसायटीत, कार्यालयात ध्वजाला वंदन करतात. सर्वत्र देशभक्तीपर गाणी ऐकू येतात. तुम्ही उद्या ध्वजाला वंदन करताना नक्की ही हिंदी गाणी लावा. देशभक्ती पर गाणी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येईल.

टॉप १० गाणी

आय लव्ह माय इंडिया

'आय लव्ह माय इंडिया' हे गाणे १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'परदेस' चित्रपटातील आहे. शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती, हरीहरन आणि आदित्य नारायण यांनी हे गायले आहे.

ए मेरे वतन के लोगों

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे गायले आहे. गाण्यातून शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली आहे.

कर चले हम फिदा

१९६४ साली प्रदर्शित झालेल्या 'हकीकत' चित्रपटात 'कर चले हम फिदा' गाणे आहे. हे गाणे उर्दू कवी कैफी आझमी यांनी हे गाणे लिहिले आहे.

Patriotic Hindi Songs
Smriti-Palash Wedding : स्मृतीसोबतच्या लग्नाआधी पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर, टीम इंडियाच्या पोरींनी चोपला अन्...

माँ तुझे सलाम

ए आर रहमान यांनी गायलेले 'माँ तुझे सलाम' गाणे ऐकतचा डोळ्यांमध्ये पाणी येते. तसेच अंगावर काटा येतो.

ए वतन

२०१८ ला रिलीज झालेल्या 'राजी' चित्रपटात 'ए वतन' गाणे आहे. हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे.

तेरी मिट्टी

२०१९ साली रिलीज झालेल्या 'केसरी' चित्रपटातील 'तेरी मिट्टी' गाणे आपल्या मनातील देशप्रेम जागे करते. हे गाणे बी प्राकने हे गाणं गायलं आहे.

मेरे देश की धरती

'मेरे देश की धरती' हे गाणे १९६७ साली प्रदर्शित झालेल्या 'उपकार' या चित्रपटातील आहे. जे गायक महेंद्र कपूर यांनी गायले आहे.

ये देश है वीर जवनों का

'नया दौर' चित्रपटातील 'ये देश है वीर जवनों का' हे गाणे आहे. जो १९५७ ला रिलीज झाला आहे. हे गाणे मोहम्मद रफी, बलबीर यांनी गायले आहे.

इतर गाणी

  • ये जो देश है तेरा- स्वदेस चित्रपट चित्रपट

  • भारत हमको जान से प्यारा हैं - रोजा चित्रपट

  • वंदे मातरम - द फायटर, ABCD2 चित्रपट

  • सुनो गौर से दुनिया वालो - हिंदुस्तानी - दस चित्रपट

  • रंग दे बसंती - रंग दे बसंती चित्रपट

  • चक दे इंडिया - चक दे इंडिया चित्रपट

  • देस रंगीला - फना चित्रपट

  • जय हो - स्लमडॉग मिलेनियर चित्रपट

  • इंडिया वाले - हॅपी न्यू इयर चित्रपट

  • फिर भी दिल हैं हिंदुस्तानी - फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपट

  • ऐसा देस हैं मेरा - वीर-जारा चित्रपट

Patriotic Hindi Songs
Shah Rukh Khan - King : डर नहीं, दहशत हूं...; 'किंग'ची दहाड, 'या' दिवसापासून थिएटरमध्ये शाहरुख खानचे राज्य, चित्रपटाची रिलीज डेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com