Rashmika-Vijay : लगीन घटिका समीप आली! रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या शाही विवाह सोहळ्याचा मंडप सजला, पाहा झलक|VIDEO

Rashmika Mandanna Wedding Preparation In Udaipur : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ती उदयपूरमध्ये साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधणार आहे. उदयपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Rashmika Mandanna Wedding Preparation In Udaipur
Rashmika-Vijaysaam tv
Published On
Summary

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा हे प्रेक्षकांचे आवडते कपल आहे.

अलिकडेच दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

रश्मिका आणि विजय आता विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोले जात आहे.

सध्या सर्वत्र सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा या पावर कपलच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा लग्न सोहळा उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये होणार असल्याचे बोले जात आहे. तेथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उदयपूर लग्नासाठी सजताना दिसत आहे.

उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे जोडपे आज (2 फेब्रुवारी 2026) लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयच्या लग्नासाठी भव्य मंडप सजताना दिसत आहे. तान्या नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्तीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

व्हिडीओत सिटी पॅलेस राजवाडा मोठ्या लाल पडद्यांनी सजवलेला दिसत होता. मोठे झुंबर लावले होते. कार्यक्रमस्थळ एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखे दिसत होते. सोनेरी रंगाच्या खाण्यापिण्याच्या भांड्यांची झलकही दिसत होती. एकंदर सध्या सर्वत्र फक्त रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची लगीन घाई पाहायला मिळत आहे.

गुपचूप साखरपुडा उरकला

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा अनेक काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोले जाते. रश्मिका आणि विजय यांनी 'गीता गोविंदम' (2018) या चित्रपटात एकत्र काम केले, ज्यामुळे डेटिंगच्या अफवा पसरल्या. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये 'डियर कॉम्रेड' मध्ये पुन्हा एकत्र काम केले. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली.

Rashmika Mandanna Wedding Preparation In Udaipur
Border 2 vs Mardaani 3 Collection : 'बॉर्डर 2' च्या वादळासमोर 'मर्दानी 3'चा डब्बा गुल? शनिवारी कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com