Border 2 vs Mardaani 3 Collection
Border 2 vs Mardaani 3 Collection

Border 2 vs Mardaani 3 Collection : 'बॉर्डर 2' च्या वादळासमोर 'मर्दानी 3'चा डब्बा गुल? शनिवारी कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Border 2 vs Mardaani 3 Box Office Collection : 'बॉर्डर 2' आणि 'मर्दानी 3'ने शनिवारी किती रुपयांचे कलेक्शन केले जाणून घेऊयात. दोन्ही चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत.
Published on
Summary

'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'मर्दानी 3' ने शनिवारी बक्कळ कमाई केली आहे.

बहुप्रतीक्षित चित्रपट 'मर्दानी 3' नुकताच रिलीज झाला आहे. 'मर्दानी 3'मधून पुन्हा एकदा राणी मुखर्जी पोलीसांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच सनी देओलचा 'बॉर्डर 2' चित्रपट एक आठवड्यापासून थिएटर गाजवताना दिसत आहे. 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. आता वीकेंडला 'बॉर्डर 2' की 'मर्दानी 3' कोणी बाजी मारली जाणून घेऊयात.

'मर्दानी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 कोटी रुपये कमावले आहे. सिनेमाने संथ सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 6 कोटी रुपये कमावले आहे. 'मर्दानी 3' दोन दिवसांत तब्बल 10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'मर्दानी 3' ने जगभरात सुमारे 14.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता 'मर्दानी 3' पहिल्या रविवारी किती कमावतो, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • पहिला दिवस - 4 कोटी रुपये

  • दिसरा दिवस - 6 कोटी रुपये

  • एकूण - 10 कोटी रुपये

'मर्दानी 3' चा फ्रँचायझीचा विक्रम

'मर्दानी 3' हा 'मर्दानी' फ्रँचायझीचा सीक्वल आहे. आतापर्यंत 'मर्दानी' सिनेमाचे दोन भाग झाले आहेत. 'मर्दानी' चित्रपट 22 ऑगस्ट 2014 ला रिलीज झाला. तर 'मर्दानी 2' सिनेमा 13 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित झाला आहे आणि आता सात वर्षांनी पुन्हा 'मर्दानी 3'प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राणी मुखर्जी चित्रपटात पोलिस शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसत आहे.

'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाने 10 दिवसांत 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी अंदाजे 17.75 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या आठवाड्यात अंदाजे 224.25 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर आणि दुसऱ्या आठवड्यात आतापर्यंत अंदाजे 28.5 कोटी रुपये कमावून 'बॉर्डर 2' ने एकूण अंदाजे 252.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. जगभरात 'बॉर्डर 2' सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Border 2 vs Mardaani 3 Collection
Bigg Boss Marathi 6 : शॉकिंग Eviction! बिग बॉसच्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट? चाहत्यांना मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com