Vijay-Rajinikanth Video : "मला प्रचंड धक्का बसला..."; CM विजय यांच्यावर रजनीकांत यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणालं?

Rajinikanth Reaction On Vijay becoming Tamil Nadu CM : रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. विजय यांच्या मुख्यमंत्री होण्यावरही प्रतिक्रिया दिली.
Rajinikanth Reaction On Vijay becoming Tamil Nadu CM
Vijay-Rajinikanth Video saam tv
Published On
Summary

विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.

विजय मुख्यमंत्री झाल्याबद्दल रजनीकांत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

रजनीकांत हे साऊथचे ज्येष्ठ अभिनेते आहेत.

साऊथचे सुपरस्टार थलपती विजय आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Vijay Thalapathy - Chief Minister of Tamil Nadu) झाले आहेत. ज्यामुळे राजकारणात एक नवीन पर्व सुरू झाले आहेत. कलाकार आणि चाहते विजय यांनी शुभेच्छा देताना अजूनही दिसत आहे. हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक ऐतिहासिक पान आहे.

थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर साऊथचे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत पाहायला मिळत आहे. एम.के. स्टॅलिन यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीवरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी या परिषदेत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी रविवारी चेन्नईतील 'पोएस गार्डन' येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात विजय यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबl रजनीकांत म्हणाले की, "विजय मुख्यमंत्री झाल्याचे जेव्हा मला समजले, तेव्हा मला अत्यंत धक्का बसला. मी राजकारणात नाही; राजकारणातून बाहेर पडून आता बराच काळ लोटला आहे. माझ्या आणि विजयमध्ये २८ वर्षांचे अंतर आहे. विजयने येथील दोन प्रमुख पक्षांच्या विरोधात ठामपणे उभे राहून स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे..."

विजय हे मुख्यमंत्री झाल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून झालेल्या टीकेला रजनीकांत यांनी उघडपणे उत्तर दिले. विमानतळावर विजयचे अभिनंदन केले नाही, हा दावा फेटाळत त्यांनी सांगितले की, त्यांनी सोशल मीडियावर आधीच शुभेच्छा दिल्या होत्या.रजनीकांत म्हणाले, "असे म्हटले गेले की मी विमानतळावर विजयचे अभिनंदन केले नाही. मात्र, तो जिंकताच मी इन्स्टाग्रामवर अभिनंदनाची पोस्ट टाकली. मी राजकारणात नाही; मी राजकारण आधीच सोडले आहे. मी निवडणुकीच्या रिंगणात नसताना त्याचा मत्सर का करेन? जे कोणाच्या नशिबात असते ते घडतेच, आणि जे नशिबात नसते ते कधीच घडत नाही."

Rajinikanth Reaction On Vijay becoming Tamil Nadu CM
Famous Actor : "घटस्फोट होत नाही, तोवर अभिनय करणार नाही"; प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, काळी जादू केल्याचा बायकोवर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com