Prathamesh Kadam: आत्महत्या की डेंग्यू...; मैत्रिणीने सांगितलं मराठी रिलस्टार प्रथमेशच्या मृत्यूचं खरं कारण

Prathamesh Kadam Death Reason: मराठी रीलस्टार प्रथमेश कदम यांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले. मैत्रीण सई उतेकरने मृत्यूचे कारण स्पष्ट केल्यानंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.
Prathamesh Kadam Death Reason
Prathamesh Kadam Death ReasonSaam Tv
Published On

Prathamesh Kadam Death Reason: सोशल मीडियावर प्रसिद्ध मराठी रीलस्टार व कंटेट क्रिएटर प्रथमेश कदम याचे 26 जानेवारी 2026 रोजी अचानक निधन झाले. त्याच्या जाण्याने चाहत्यांना आणि त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपासून तो आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. पण त्याचा उपचारांचा परिणाम झाला नाही. कालपासून सोशल मीडियावर त्याच्या निधनाचे वेगवेगळे कारण समोर येत आहेत. पण त्याचे निधन कसे झाले हे त्याच्या मित्रमैत्रिणींनी सांगितले आहे.

प्रथमेश कदमची जवळची मैत्रीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सई उतेकरने एक व्हिडिओ पोस्ट करून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले. तिच्या म्हणण्यानुसार, प्रथमेशला पोटातील इन्फेक्शन झाल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये महिनाभर उपचार घेत होता. पण त्या उपचारांचा हवा तसा परिणाम झाला नाही. अखेर पहाटे चारच्या दरम्यान त्याचे निधन झाले. आपल्या चाहत्यांना खूप प्रश्न पडले होते की अचानक काय घडले, म्हणून सई यांनी सोशल मीडिया वरून ही माहिती दिली आणि लोकांना त्याच्या कुटुंबियांना थेट त्रास देऊ नका अशी विनंती केली.

Prathamesh Kadam Death Reason
Varun Dhawan: वरुण धवनला मेट्रोमध्ये स्टंट करणं पडलं माहागात; ट्रोलर्स म्हणाले, 'जिथे जाईल तिथे अपमान...'

प्रथमेशचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग होता. विशेषतः त्याची आई प्रज्ञा कदम सोबत बनवलेल्या माय–लेक रील्सने त्याला लोकप्रियता मिळाली. या व्हिडिओंना लाखो लोकांनी पसंती दिली होती आणि ते घराघरात प्रसिद्ध झाले होते. त्याच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोशल मीडिया वर त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Prathamesh Kadam Death Reason
Sayaji Shinde: 'कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही...' प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या नगरसेविकेला टोला

जरी कुटुंबियांनी अधिकृतपणे मृत्यूचे कारण जाहीर केले नसले, परंतु काही रिपोर्टनुसार तो काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत होता आणि त्याचा मृत्यू त्या आजारामुळे झाला असे बोलण्यात येत आहे.त्याच्या अचानक जाण्याने मराठी सोशल मीडिया विश्वात दु:खाची लाट पसरली आहे आणि चाहत्यांनी त्याच्या आठवणींनी भरलेले पोस्ट शेअर करीत आपली भावना व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com