Varun Dhawan: वरुण धवनला मेट्रोमध्ये स्टंट करणं पडलं माहागात; ट्रोलर्स म्हणाले, 'जिथे जाईल तिथे अपमान...'

Varun Dhawan: वरुण धवनने नुकताच मुंबई मेट्रोमधून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने केलेला स्टंट त्याला महागात पडला. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने वरुण धवनला असा स्टंट पुन्हा न करण्याचा कडक इशारा दिला आहे.
Varun Dhawan
Varun DhawanSaam Tv
Published On

Varun Dhawan: बॉर्डर २ फेम अभिनेता वरुण धवन त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे वादात सापडला आहे. यामध्ये तो मेट्रोमध्ये पुल-अप करत असल्याचे दिसत आहे. मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने आता या व्हिडिओ अॅक्शन घेतली आहे. त्याला आता मुंबई मेट्रोमध्ये असे स्टंट करू नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच अशा स्टंटमुळे शिक्षा होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.

वरुण मेट्रोने बॉर्डर २ पाहण्यासाठी जात होता

वरुण धवनचा चित्रपट बॉर्डर २ २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. त्याच्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून, वरुणने ट्रॅफिक टाळण्यासाठी चित्रपट पाहायला जाताना मेट्रोने जाण्याचा व्हिडिओ बनवला. त्याने त्याच्या चाहत्यांना तो कोणत्या थिएटरमध्ये जात आहे याचा अंदाज घेण्यास सांगितले. मेट्रोच्या आत, वरुण लोकांशी गप्पा मारताना आणि पुल-अप करताना दिसला. आता, अधिकृत वेबसाइटने व्हिडिओवरून वरुणला कडक इशारा दिला आहे.

Varun Dhawan
Sunita Ahuja: 'तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये...'; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप

व्हिडिओमध्ये डिस्क्लेमर असायला हवा होता

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने व्हिडिओसोबत लिहिले आहे की, "हा व्हिडिओ तुमच्या चित्रपटांसारखाच डिस्क्लेमरसह यायला हवा. वरुण धवन महा मुंबई मेट्रोमध्ये हे करून नका. आम्हाला समजते की मेट्रोमध्ये मित्रांसोबत फिरणे चांगले आहे. परंतु ते पकडण्याचे हँडल लटकण्यासाठी नाहीत. अशा कृतीसाठी मेट्रो वाहतूक नियमन कायदा २००२ अंतर्गत शिक्षा होऊ शकते. जर गंभीर असेल तर दंडात तुरुंगवास देखील समाविष्ट असू शकतो. म्हणून मित्रांनो, फिरा, पण नियम मोडू नका. महा मुंबई मेट्रोमधून जबाबदारीने प्रवास करा."

Varun Dhawan
Mahhi Vij: घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या 6 वर्षांच्या लेकीसाठी घेतली तब्बल 50 लाखाची कार, पाहा VIDEO

लोकांनी वरुणची खिल्ली उडवली

या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, "सार्वजनिक वाहतूकीत नियम पाळणं गरजेच आहे." दुसऱ्याने लिहिले आहे की, "ही जाणीव खूप आवश्यक होती. शाब्बास टीम." दुसऱ्याने लिहिले आहे की, "वरुणवर कारवाई करा." आणखी एकाने लिहिले आहे की, "ही वरुणकडून एक चांगली आठवण आहे. मेट्रोची सुरक्षा महत्त्वाची आहे." तर आणखी एकाने लिहिले आहे की, " हा वरुण जिथे जाईल तिथे अपमान करुन येतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com