Sayaji Shinde: 'कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही...' प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या नगरसेविकेला टोला

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे यांनी एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही असे स्पष्ट केले.
Sayaji Shinde
Sayaji ShindeSaam tv
Published On

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे यांनी एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. शेख यांनी ठाणे महापालिका निवडणुकीनंतर विजयाच्या भाषणात 'मुंब्रा संपूर्ण हिरवा करू' असे विधान केले होते. यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी त्यांना ट्रोल करायला आणि टिका करायला सुरुवात केली.

टिव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदे म्हणाले की, “कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही,” आणि सर्व रंग निसर्गाचेच आहेत. ते कोणत्याही पक्ष किंवा समुदायाचे नाहीत. निसर्ग आपलं मूळ आहे. त्याच्यात सगळे रंग आहेत. कुणाला आव आणून असं आणता येत नाही. ते आतून येतात आणि ते फक्त झाडांमधून येतात.'

Sayaji Shinde
Sunita Ahuja: 'तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये...'; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप

सहर शेख यांच्या विधानावरून तणाव वाढला आहे. कारण काही राजकीय नेत्यांनी हे विधान राजकीय तसेच सामाजिक दृष्टिकोनातून चुकीचे आणि भेदभाव निर्माण करणारे असल्याचे म्हटले होते. त्यावर सहर शेख यांनी स्पष्टीकरण दिले की, हिरवा हा त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग असल्यामुळे त्यांनी तो शब्द वापरला आणि कोणतीही साम्प्रदायिक भावना व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. जर त्यांचा पक्ष भगवा रंग असता, तर त्या तो रंग म्हणाल्या असत्या, असेही त्यांनी सांगितले.

Sayaji Shinde
Mukta Barve: कोणी कुठेतरी आपल्यासाठी आहे...; नात्यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या 'माया'ची, पाहा टिझर

तर, सयाजी शिंदे हे एक उत्तम अभिनेते तर आहेतच पण याशिवाय ते वन संवर्धनासाठी देखील काम करतात. याच मुलाखतीमध्ये सयाजी शिंदे यांनी सांगितलं की, 'महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरू करतोय. संतांचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या एक हजार झाडं लावली असून आणखी १० हजार झाडं लावायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com