Mukta Barve: कोणी कुठेतरी आपल्यासाठी आहे...; नात्यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या 'माया'ची, पाहा टिझर

Marathi Movie Maya: आदित्य इंगळे यांचा ‘माया’ टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वेसह सिद्धार्थ चांदेकर,विजय केंकरे, गिरीश ओक आणि रोहिणी हट्टंगडी महत्वाच्या भूमिकेत आहेत.
Marathi Movie Maya
Marathi Movie MayaSaam Tv
Published On

Mukta Barve: नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.

Marathi Movie Maya
Sunita Ahuja: 'तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये...'; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचं प्रभावी प्रतिनिधित्व करतात. तर गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.

Marathi Movie Maya
Varun Dhawan: वरुण धवनला मेट्रोमध्ये स्टंट करणं पडलं माहागात; ट्रोलर्स म्हणाले, 'जिथे जाईल तिथे अपमान...'

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ‘’बर्‍याच वेळा आपण मनाला गाठी मारून ठेवतो. आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही घटना आपल्यावर खोलवर आघात करतात आणि त्यालाच आपण संपूर्ण आयुष्य समजतो. त्या अनुभवांवर प्रतिक्रिया देण्यात किंवा मनात अढी धरून ठेवण्यात आपण खूप काळ घालवतो. काळाच्या ओघात ही अढी सुटली, तरच आयुष्य प्रवाही होऊ शकतं. ही अढी नात्यांमधून, जिव्हाळ्यातून सुटते आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा एकदा पुढे सरकायला लागतं. ‘माया’ हा चित्रपट याच भावनिक प्रवासावर भाष्य करतो.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित माया या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही हळवी तरीही खोलवर जाणारी कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com