Salman Khan : धक्कादायक! ३५ लाखांच्या कर्जासाठी थेट सलमान खानला धमकी देण्याचा बनाव, आरोपीला अटक

Mumbai Crime : मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्याचा बनाव करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
Mumbai Crime
Salman Khan SAAM TV
Published On
Summary

सलमान खानला धमकी देण्याचा बनाव

मुंबईत आरोपीला अटक

३५ लाखांच्या कर्जासाठी रचला खेळ

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

बॉलिवूड इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा बनाव करून त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणात आसिफ मोहम्मद मुस्लिम राजा (२५) याला अटक केली आहे. आरोपी हा बिहारमधील सीवान जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी सुमारे ३५ लाख रुपयांच्या कर्जात बुडाला होता. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे त्याच्यावर हे कर्ज झाल्याचे चौकशीत समोर आले. कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याने सलमान खानला धमकी दिल्याचा बनाव रचल्याचा आरोप आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

सलमानच्या घराबाहेर जाऊन दिली खोटी माहिती

१८ फेब्रुवारी रोजी आरोपी वांद्रे पश्चिम येथील सलमान खानच्या निवासस्थानी गॅलेक्सी अपार्टमेंट येथे गेला. त्याने सुरक्षा रक्षकांना तीन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानला शारीरिक इजा करण्याची सुपारी दिल्याची खोटी माहिती दिली. या व्यक्तींनी त्याला २.१५ लाख रुपये आणि तीन मोबाईल फोन दिल्याचा दावाही त्याने केला. आरोपीला सुरक्षा रक्षकांनी सलमान खानपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी वांद्रे पोलिसांना माहिती दिली आणि प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला.

Mumbai Crime
Singer Death : संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; प्रसिद्ध गायिकेचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

चॅटजीपीटीच्या मदतीने तयार केला धमकीचा संदेश

तपासादरम्यान क्राईम ब्रँचने आरोपीच्या चार मोबाईल फोनमधील व्हॉट्सॲप चॅटचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून धमकीची संपूर्ण कहाणी बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपीने चॅटजीपीटीच्या मदतीने धमकीचा संदेश तयार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अनोळखी व्यक्तींकडून पैसे मिळवण्यासाठी आरोपीने आपल्या गावातून फोन-पे च्या माध्यमातून १.३० लाख रुपये मागवले होते. ही रक्कम त्याने वांद्रे येथील एका मनी ट्रान्सफर एजंटकडून घेतल्याचे समोर आले असून, पोलिसांनी संबंधित एजंटचा जबाब नोंदवला आहे.

पैसे उकळण्याच्या प्रयत्नात आरोपीने केवळ सलमान खानच नव्हे, तर शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या घराचीही माहिती घेतल्याचा आरोप आहे. तसेच सुरक्षा रक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. क्राईम ब्रँचने आरोपीकडून चार मोबाईल फोन आणि रोकड जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com