Shreya Maskar
वांद्रे किल्ला हा 'कॅस्टेला डी अगुआडा' (Castella de Aguada) म्हणून ओळखला जातो. मुंबई मधील बायरामजी जीजीभॉय रोडवरील 'बँडस्टँड प्रोमेनेड'च्या टोकावर हा किल्ला वसलेला आहे.
'कॅस्टेला डी अगुआडा' या नावाचा पोर्तुगीज भाषेतून थेट अर्थ 'वॉटरपॉइंटचा किल्ला' (पाण्याच्या स्रोताचा किल्ला) असा होतो. हा किल्ला मुद्दाम 'लँड्स एंड' येथे बांधला गेला होता कारण त्या भागात गोड्या पाण्याचा नैसर्गिक स्रोत होता.
वांद्रे किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर (७९ फूट) उंचीपर्यंत पसरलेल्या अनेक वेगळ्या खडकाळ स्तरांवर असमानपणे बांधलेला आहे. वीकेंडला पर्यटक येथे गर्दी करतात.
वांद्रे किल्ला सुंदर सू्र्यास्त, चित्रपटाचे शूटिंगसाठी ओळखला जातो. या किल्ल्यावर 'दिल चाहता है', 'वॉन्टेड' आणि 'जाने तू... या जाने ना' यांसारख्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
वांद्रे किल्ला पोर्तुगीजांनी 1640 मध्ये बांधला होता. तो एक रणनीतिक टेहळणी बुरूज आणि माहीम उपसागर आणि अरबी समुद्राच्या नजरेतून संरक्षणात्मक तटबंदी म्हणून काम करत होता.
तुम्ही वांद्रेपर्यंत ट्रेनने प्रवास करा. वांद्रे स्टेशनला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने तुम्ही जाऊ शकता. १० -१५ मिनिटांत पोहचाल.
गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा लेणी, बाणगंगा तलाव, कान्हेरी लेणी ही मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणे आहेत. तुम्ही येथे नक्की भेट द्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.