Singer Death : संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; प्रसिद्ध गायिकेचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Singer/ Actress Passes Away : संगीत विश्वावर शोककळा पसरली. प्रसिद्ध गायिकेचे निधन झाले आहे. गायिकेची यशस्वी कारकीर्द जाणून घेऊयात.
Singer/ Actress Passes Away
Singer DeathSAAM TV
Published On
Summary

संगीतविश्वाला मोठा धक्का

ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि संगीतकार डॉली पार्टन (Dolly Parton) यांचे निधन झाले आहे. गायिका डॉली पार्टन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. डॉली पार्टन या अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका होत्या.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गायिका डॉली पार्टन यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉली पार्टन यांचे निधन मंगळवारी नॅशविले, टेनेसी येथे शांततेत निधन झाले. गायिकेची 'कर्करोगाशी झुंज' अपयशी ठरली आणि तिची प्राणज्योत मालावली. गायिकेच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉली पार्टन या 'क्वीन ऑफ कंट्री' म्हणून प्रसिद्ध आहेत; त्या एक दिग्गज अमेरिकन गायिका-गीतकार, अभिनेत्री, व्यावसायिक आणि समाजसेविका आहेत, ज्यांनी सात दशके संगीत क्षेत्राला आकार दिला.त्यांचा पहिला अल्बम, "हॅलो, आय अॅम डॉली," १९६७ मध्ये प्रदर्शित झाला. डॉली पार्टन या ११ ग्रॅमी पुरस्कार विजेत्या दिग्गज होत्या. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केले.

Singer/ Actress Passes Away
Director Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

डॉली पार्टन यांची संगीतकार आणि गायिका म्हणून कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ चालली. या काळात त्यांनी 'जोलीन', 'आय विल ऑलवेज लव्ह यू', '९ टू ५', 'कोट ऑफ मेनी कलर्स' आणि 'हिअर कम अगेन' यांसारख्या ३,००० हून अधिक गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com