

Baipan Bhaari Deva Film Actress Vandana Gupte: सध्या मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती पाहायला दिसून येत आहे. या वर्षात बॉलिवूडपेक्षा मराठी चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. यामध्ये ‘वेड’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’चा ही क्रमांक लागला आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी थिएटर्समध्ये महिलांनीच तुफान गर्दी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. ही मीम सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये चित्रपटात शशीचे पात्र साकारणाऱ्या वंदना गुप्ते यांना पोलिसांनी अटक केल्याचे दिसत आहे. सोबतच शेअर केलेल्या फोटोत एक महिला पोलिस वंदना गुप्तेंना गाडीत टाकताना दिसत आहे. केदार शिंदेंनी या फोटोत लिहिलंय की, “ ‘बाईपण भारी देवा’ ह्या सिनेमाला फक्त महिलांची गर्दी का ? या मुद्द्यावर सिनेमातील शशीला अटक !! आता पुरुषांनी भरमसाठ गर्दी करून.. तीला सोडावावं.”
या फोटोला केदार शिंदेंनी कॅप्शनमध्ये लिहिलयं की, हे SOLID आहे. #baipanbhaarideva #बाईपणभारीदेवा. आता हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंटही करत आहेत. यावर एक युजर म्हणतो, बायकांनी तर बघावाच पण पुरुषांनी ही आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे..... जर कोणत्या स्त्री शी अबोला धरला असेल तर तो मिटवण्याची ताकद देईल हा सिनेमा, तर काहींनी मी माझ्या नवऱ्यासोबत चित्रपट पाहायला गेले होते, अशी देखील कमेंट केली. या पोस्टवर त्याला अनेक युजर्सने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
केदार शिंदे दिगदर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६.१० कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर मात्र चित्रपटाने आपल्या कमाईच्या बाबतीत मागे वळून पाहिले नाही. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १३.५० कोटींची कमाई केली.
पहिल्या आठवड्यातील कमाईनंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने दुप्पटीने कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २६. १९ कोटी इतकी कमाई केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात मंगळागौरीसाठी जमलेल्या सहा बहिणींची धमाल गोष्ट चित्रपटात दाखवली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.