OMG 2 Teaser Released : पंकज त्रिपाठीला शिव बनून अक्षय कुमार दाखवणार मार्ग... 'OMG 2'चा टीझर प्रदर्शित

OMG 2 Teaser : अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ओ माय गॉड'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
OMG 2 Teaser Released : पंकज त्रिपाठीला शिव बनून अक्षय कुमार दाखवणार मार्ग... 'OMG 2'चा टीझर प्रदर्शित
Saam TV
Published On

Akshay Kumar Upcoming Movie OMG 2 Teaser Out : अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ओ माय गोड'चा टीझर नुकताच अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ओ माय गॉड'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. अक्षय कुमारने त्याचा या चित्रपटातील लूक शेअर केल्यापासून चित्रपट चर्चेत आहे.

अक्षय कुमारच्या 'ओ माय गॉड 2'च्या पोस्टरनंतर त्याने त्याच्या लूकचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. अखेर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Latest Entertainment News)

OMG 2 Teaser Released : पंकज त्रिपाठीला शिव बनून अक्षय कुमार दाखवणार मार्ग... 'OMG 2'चा टीझर प्रदर्शित
Bigg Boss OTT 2 Update : सायरस ब्रोचाची 'बिग बॉस ओटीटी 2' मधून अचानक एक्झिट ; नेमकं काय आहे कारण ?

टीझरची सुरुवात पंकज त्रिपाठीच्या व्हाईस ओव्हरने होते. 'देव आहे की नाही याचे प्रमाण एखादी व्यक्ती आस्तिक किंवा नास्तिक होऊन देखिलं देऊ शकतात. पण देवाने पाठवलेले देवदूत कधीच भेद करत नाही. मग तो नास्तिक कांजीलाल मेहता असो किंवा आस्तिक शांती करण मुद्गल असो. आणि त्याने संकटात असताना देवाला दिलेली हाक त्याला नेहमी त्याच्या भक्तांकडे आकर्षित करते.' याने टीझरची सुरुवात होते.

चित्रपटाच्या टीझरमध्ये पहिल्या भागातील काही सीन्स दाखविण्यात आले आहेत. त्यानंतर 'ओ माय गॉड' चित्रपटातील दुसऱ्या भागतीची कथा दाखविण्यात आले आहे. पहिल्या भागात कांतीलाल नास्तिक असतो पण दुसऱ्या भागातील शांती करण मुद्गल हा श्रद्धाळू आहे. त्याच्यावरील संकट तारण्यासाठी अक्षय कुमार देवदूत बनून येतो. अशी चित्रपटाची कथा आहे.

'ओ माय गॉड २'चा टीझर चित्रपट प्रदर्शनाच्या बरोबर एक महिना आधी रिलीज केले आहे. चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सोमवारी अक्षय कुमारने त्याची OMG2 चित्रपटातील एक क्लिप शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये अक्षय शंकरच्या अवतारात दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने टीझरचे अपडेट शेअर केले होते.

अक्षयच्या या व्हिडिओवर लोकांनी त्याला धमकीवजा इशारा दिला होता. चित्रपटात सनातन धर्माची चेष्टा अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे लोकांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com