Madhurani Gokhale : चाहत्यांसाठी गुडन्यूज; अरुंधतीची 'या' मालिकेत दमदार एन्ट्री, पाहा VIDEO

Madhurani Gokhale New Series Update : प्रेक्षकांची आवडती अरुंधती आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मधुराणी गोखलेची 'आई कुठे काय करते' मालिका संपून आता काही महिने झाले आहेत.
Madhurani Gokhale New Series Update
Madhurani GokhaleSAAM TV
Published On

प्रेक्षकांची आवडती मालिका 'आई कुठे काय करते' संपून आता काही महिने झाले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील झाली. आपल्या आयुष्यातील वेगवेगळी रूपे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'आई कुठे काय करते' मालिकेत आईची महत्त्वाची भूमिका मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) हिने केली होती. या भूमिकेमुळे मधुराणी चाहत्यांचा घरात पोहचली. तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यामुळे चाहते खूप नाराज होते. आता मालिकेतील आईची भूमिका साकारणारी मधुराणी पुन्हा पडद्यावर कधी पाहायला मिळेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र अखेर पुन्हा एकदा मधुराणी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' (Aai Ani Baba Retire Hot Aahet ) ही मालिका करत आहे. या मालिकेत तुमच्या आवडत्या अरुंधतीची म्हणजे मधुराणीची एन्ट्री होणार आहे.

सध्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत स्वीटी आणि मकरंदची लगीन घाई पाहायला मिळत आहेत. यांच्या लग्नाला अरुंधतीची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेच्या सेटवर मधुराणी आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये मधुराणी निवेदिता सराफ यांच्यासोबत बोलताना गप्पा मारताना दिसत आहे. आता मधुराणी नेमकी कोणत्या भूमिकेत मालिकेत पाहायला मिळणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. मधुराणीने सेटवर सर्वांशीच मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. मधुराणी काय म्हणाली, "तिला पुन्हा सेटवर येऊन खूप आनंद होत आहे. सेटवरची धावपळ, स्क्रिप्ट, कॅमेरा, कट या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत."

Madhurani Gokhale New Series Update
Saif Ali Khan: नोकरी गेली, लग्न मोडले...; सैफ अली खानवरील हल्ल्याने उद्ध्वस्त केले 'या' तरुणाचे आयुष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com