Madhurani Prabhulkar: 'माझ्या वडिलांच्या कामाचं...''आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचे भाजी मंडईतील फोटोशूट चर्चेत

Madhurani Prabhulkar Photoshoot: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते. मधुराणीने नुकतेच एक छान फोटोशूट केले आहे. तिने पुण्याच्या भाजी मंडईत हे फोटोशूट केले आहे.
Madhurani Prabhulkar Photoshoot
Madhurani Prabhulkar PhotoshootSaam Tv

मराठमोळी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमीच चर्चेत असते. मधुराणीची 'आई कुठे काय करते' मालिकेतील भूमिका सर्वांनाच आवडते. मालिकेत ती अरुंधती पात्र साकारत आहे. अरुंधती ही आपल्या घरातीलच व्यक्ती असल्यासारखे प्रेक्षकांना वाटते. मधुराणी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. मधुराणीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट मधुराणीसाठी खूप खास आहे. मधुराणीने आपल्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी नवीन फोटोशूट केले आहे.

मधुराणीने लव्हेंडर कलरची कॉटनची साडी, त्यावर लाल रंगाचा कलमकारी ब्लाउज परिधान केला आहे. तिने केसांत गुलाबाचे फुल माळले आहे. मधुरानीने या लूकवर ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे. साधा मेकअप करत मधुरानीने खूप सुंदर लूक केला आहे. मधुराणीच्या या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मधुराणीने या फोटोंवर खास कॅप्शन दिले आहे.

मधुराणीने हे खास फोटोशूट भाजी मंडईत केले आहे. मधुराणीने फोटो शेअर करत 'एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली.या उत्साही आणि क्रिएटिव्ह गँगचे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे.पुण्यातील भाजी मंडई. माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण. तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग. सकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील', असं कॅप्शन दिले आहे.

Madhurani Prabhulkar Photoshoot
Trupti Dimri: नॅशनल क्रश तृप्ती डिमरी आता रणबीर कपूरची शेजारीण, मुंबईतील अलिशान घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

मधुराणीने एका फॅशन ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. ती या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. मधुराणीच्या या फोटोंवर चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केले आहे. मधुराणी सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करत आहे. मधुराणीची 'आई कुठे काय करते' मालिका ४ वर्ष सुरु आहे.

Madhurani Prabhulkar Photoshoot
HBD Sonam Kapoor: अनिल कपूरची लेक, तरीही सोनम कपूरने केलं वेटरचं काम; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com