HBD Sonam Kapoor: अनिल कपूरची लेक, तरीही सोनम कपूरने केलं वेटरचं काम; जाणून घ्या सविस्तर

Sonam Kapoor Birthday: अभिनेत्री सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनम कपूर आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
HBD Sonam Kapoor
HBD Sonam KapoorSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनम कपूर (Sonam Kapoor) आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम कपूर ही चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांची लेक आहे. सोनम कपूर स्टार किड असूनही तिच्या करिअरच्या सुरुवातील खूप संघर्ष करावा लागला. सोनमने सुरुवातील वेटर म्हणून काम केले होते.

सोनम कपूरने १५ वर्षाची असताना वेटर म्हणून पहिले काम केले होते. ती सिंगापूरमध्ये शिकत असताना तिने हे काम केले होते. सोनमने आपल्या पॉकेट मनीसाठी एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये काम केले होते. तिने आठवड्याभरातच वेटरची नोकरी सोडली.

सोनम कपूरला खरं तर बॉलिवूडमध्ये करिअर करायचे नव्हते. परंतु संजय लिला भन्साळी यांनी सोनमच्या मनात चित्रपटांची आवड निर्माण केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत नशीब आजमवण्याचा विचार केला. सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचे पहिले सहा चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर मात्र तिला अभिनयात खूप यश मिळाले.

HBD Sonam Kapoor
Amhi Jarange Trailer : "आम्ही जरांगे"चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तिने भाग मिल्खा भाग, नीरजा. पॅडमॅन, संजू या चित्रपटात काम केले आहे.

HBD Sonam Kapoor
Kangana Ranaut Post : "हे योग्य असेल तर, बलात्कार अन् खूनही..."; कंगणा रणौतने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com