Saif Ali Khan: नोकरी गेली, लग्न मोडले...; सैफ अली खानवरील हल्ल्याने उद्ध्वस्त केले 'या' तरुणाचे आयुष्य

Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथे ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगितले.
Saif Ali Khan Attack Case suspect Akash Kanojia
Saif Ali Khan Attack Case suspect Akash Kanojia Google
Published On

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला झाला होता. मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. ६ दिवसांच्या उपचारानंतर सैफ रुग्णालयातून घरी परतला आहे. या हल्ल्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे एका तरुणाला नोकरी गमवावी लागली, त्याचे लग्न मोडले आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. खरं तर, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या एका व्यक्तीवर हा वाईट प्रसंग आला असून त्याच्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागत आहे.

मुख्य आरोपी असल्याचा दावा कुटुंबासाठी धक्कादायक आहे

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी १८ जानेवारी रोजी छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरून ३१ वर्षीय आकाश कनौजिया या चालकाला अटक केली. दुसऱ्या दिवशी, हल्ल्यातील आरोपी शरीफुल मोहम्मदला अटक करण्यात आली. म्हणून आरपीएफने आकाशला सोडले. आकाश म्हणाला की, जेव्हा माध्यमांनी माझे फोटो दाखवायला सुरुवात केली आणि मी या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचा दावा करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या कुटुंबाला धक्का बसला. मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्या मिशा आहेत हे त्यांना लक्षात आले नाही म्ह्णून त्यांनी माझ्यावर संशय घेतला. पण, सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला मिशा नव्हत्या.

Saif Ali Khan Attack Case suspect Akash Kanojia
Saif Ali Khan: सैफवरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिंगरप्रिंट रिपोर्ट निगेटिव्ह, पश्चिम बंगाल कनेक्शन समोर

मुंबई पोलिसांनी मला मारहाणही केली

आकाशने दावा केला की घटनेनंतर मला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारले की मी कुठे आहे. मी घरी असल्याचे त्यांना सांगितले तेव्हा फोन कट झाला. मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला जात होतो. तेव्हा मला दुर्गमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि नंतर रायपूरला नेण्यात आले. तिथे पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली.

Saif Ali Khan Attack Case suspect Akash Kanojia
Remo D'Souza: जीवे मारण्याची धमकी, इच्छापूर्तीचे धाडस; चेहरा झाकून रेमो डिसूझा पोहोचला महाकुंभ मेळ्यात!

नोकरी गेली, लग्न मोडले

आकाश म्हणाला, सुटकेनंतर त्याच्या आईने त्याला घरी येण्यास सांगितले पण मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्याने मला कामावर येऊ नको असे सांगितले. त्याने माझे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. माझ्या आजीने मला सांगितले की माझ्या होणार्‍या बायकोच्या कुटुंबाने मला अटक झाल्यानंतर लग्न मोडले.

Saif Ali Khan Attack Case suspect Akash Kanojia
Zanai Bhosle - Siraj: मोहम्मद सिराज करतोय गायिका आशा भोसलेंच्या नातीला डेट? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचे सत्य

माझे सर्वस्व गमावले

कनोजिया यांनी दावा केला की त्यांच्या भावाचा दीर्घकाळ उपचारानंतर मृत्यू झाला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला विरारमधील त्यांचे घर विकावे लागले आणि कफ परेडमधील चाळीत स्थलांतर करावे लागले. कनौजिया म्हणाले की, माझ्याविरुद्ध कफ परेडमध्ये दोन आणि गुरुग्राममध्ये एक खटला दाखल आहे. पण याचा अर्थ असा नाही की मला अशा प्रकारे संशयित म्हणून अटक करावी आणि नंतर गोंधळात टाकावे. शरीफुलला दुर्ग रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच मला सोडण्यात आले ही देवाची कृपा आहे. पण आता मला न्यान हवा आहे. पोलिसांच्या एका चुकीमुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com