Mouni Roy-Pulkit Samrat
KSBKBT 2 UpdateSAAM TV

KSBKBT 2 Update : 'क्योंकि सास भी कभी बहू थी २'मध्ये बॉलिवूडच्या २ सेलिब्रिटींची धमाकेदार एन्ट्री, कोणत्या भूमिकेत झळकणार?

Mouni Roy-Pulkit Samrat : 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. मालिकेत दोन बॉलिवूड कलाकारांची एन्ट्री झाली आहे.
Published on

प्रेक्षकांची आवडती मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सध्या या शो संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'मध्ये (Kyunki Sas Bhi Kabhi Bahu Thi Season 2) बॉलिवूडच्या कलाकारांची वर्णी लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'मध्ये अभिनेत्री मौनी रॉय आणि अभिनेता पुलकित सम्राटची एन्ट्री झाली आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये पुलकित सम्राटने लक्ष्य विरानीची भूमिका साकारली होती. तर मौनी रॉयने कृष्णा तुलसीच्या भूमिकेत दिसली. मीडिया रिपोर्टनुसार, मौनी रॉयच्या मनोरंजनसृष्टीतील कामाची सुरूवात 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधून झाली.

वर्कफ्रंट

अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) आजवर अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. तिची 'नागिन' मालिका खूप गाजली आहे. तसेच तिने गोल्ड, ब्लॅक आऊट, ब्रम्हास्त्र यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. पुलकित सम्राटचा (Pulkit Samrat)मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. त्याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. फुकरे, फोन भूत, वीरे की वेडिंग यांसारख्ये हिट चित्रपट केले आहे.

'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'

'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani ) या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांना या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी मालिकेत 'तुलसी विरानी' ही भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या भागातही स्मृती इराणी पाहायला मिळणार आहेत. मालिका 29 जुलै पासून रात्री 10:30 वाजता 'स्टार प्लस' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Mouni Roy-Pulkit Samrat
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची 'किंगडम'च्या रिलीजपूर्वी तब्येत बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com