Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची 'किंगडम'च्या रिलीजपूर्वी तब्येत बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

Vijay Deverakonda Hospitalised : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा सध्या रुग्णालयात दाखल आहे. 'किंगडम' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्याची प्रकृती बिघडली आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Vijay Deverakonda Hospitalised
Vijay Deverakonda SAAMTV
Published On

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंगडम'मुळे (Kingdom ) चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र आता विजयच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'किंगडम'च्या रिलीज पूर्वी विजय देवरकोंडाची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला नेमक झालं काय, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडाला डेंग्यू (Dengue ) झाला आहे. तो सध्या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याचे बोले जात आहे. विजय देवरकोंडाला 20 जुलैपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो असे बोले जात आहे. यावेळी त्याचे कुटुंब त्याच्यासोबत आहे. चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच त्याच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत. विजय देवरकोंडाच्या दमदाक कमबॅकची चाहते वाट पाहत आहेत.

'किंगडम' रिलीज डेट?

विजय देवरकोंडाची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे 'किंगडम'च्या प्रमोशनला ब्रेक लागला आहे. 'किंगडम' चित्रपट 31 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'किंगडम' हा स्पाय थ्रिलर चित्रपट असेल. चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे.

'किंगडम' ओटीटी रिलीज

विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे. थिएटर गाजवल्यावर 'किंगडम' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने 'किंगडम'चे ओटीटी राइट्स 50 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. मात्र अद्याप 'किंगडम'च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर झाली नाही.

Vijay Deverakonda Hospitalised
Ranveer Singh : रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवर पाकिस्तानी झेंडा, नेटकऱ्यांना राग अनावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com