ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डेंग्यू हा एक वायरल इन्फेक्शन आहे. एडिस डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू होतो. हे डास बहुतेकदा घाणेरड्या पाण्यात वाढतात आणि स्वच्छतेचा अभाव असलेल्या भागात जास्त आढळतात.
डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये, डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हेमोरेजिक फिवर देखील होऊ शकतो.
डेंग्यू झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
डेंग्यूमुळे अचानक ताप येऊन थरथरणे आणि थंडी लागणे हे देखील सामान्य लक्षण आहे. अशावेळी ताप 104°F पर्यंत पोहोचू शकतो.
डेंग्यूला अनेकदा "ब्रेकबोन फिव्हर" असे म्हणतात कारण यावेळी शरीराला हाडे तुटल्यासारखे वाटते. पाठ, कंबर, हात, पाय आणि सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात, ज्यामुळे हालचाल करणे कठीण होऊ शकते.
ताप आणि विषाणूंमुळे शरीराची ऊर्जा झपाट्याने कमी होते. अशावेळी रुग्णाला सतत थकवा, सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो. कधीकधी बरे झाल्यानंतरही ही अशक्तपणा अनेक दिवस राहतो.
पाणी साचू देऊ नका, मच्छरदाणी आणि प्रतिबंधक औषधे वापरा. फूल स्लीवज असलेले कपडे घाला आणि ताप असल्यास वेळेवर स्वतःची तपासणी करा.