ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॅालिवूडचा सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला. तो सध्या मुंबईच्या लीलावची रुग्णालयात अॅडमिट आहे.
माहितीनुसार, मध्यरात्री चोर सैफ अली खानच्या घरात घुसला. चोराने चाकूने सैफवर वार केला आहे.
सैफ अली खानचे वडील मंसूर अली खान पटौदी भारतीय क्रिकेटर होते. तर आई शर्मिला टगोर ही बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याने करीना कपूरसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
सैफ अली खान याने बॅालिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली. चला तर जाणून घेऊया सैफ किती शिकला आहे.
सैफ अली खान हा बॅालिवूडमधील उच्च शिक्षित कलाकारांपैकी एक आहे.
सैफ अली खानने त्याचे सुरुवाती शिक्षण हिमाचल प्रदेशच्या फेमस लॅारेंस बोर्डिंग स्कूल मधून पूर्ण केले आहे.
९ वर्षाचा असताना तो युनायटेड किंगडमला पुढील शिक्षणासाठी गेला. हर्टफोर्डशायरमधील लॅाकर्स पार्क स्कूल येथून त्याने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.
यूकेच्या विनचेस्टर कॅालेज मधून त्याने आपली ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केली.