ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाटी ट्रेनचा प्रवास अनेकवेळा आरामदायी ठरतो.
भारतातून (Indian Railway) अशाही काही ट्रेन्स आहेत जे चक्क भारतातून परदेशात जातात.
भारतातून (India) बांग्लादेशला जाणारी बंधन एक्सप्रेस आंतरराष्ट्रीय ट्रेन म्हणून ओळखली जाते.
ही ट्रेन कोलकोतावरुन सुटते आणि बांग्लादेशच्या खुलना स्टेशनवर थांबते.
मैत्री एकस्प्रेस ही ट्रेन देखील भारतातून बांग्लादेशला जाते.
मैत्री एक्सप्रेस कोलकातावरुन सुटते आणि बांग्लादेशची राजधानी ढाका पर्य़ंत धावते.
भारत ते पाकिस्तान धावणारी समझौता एक्सप्रेस मधल्या काळात बंद करण्यात आली होती. ही ट्रेन अमृतसरवरुन सुटते.
जोधपूरवरुन सुटणारी थार एक्सप्रेस ट्रेन पाकिस्तानला जाते.