ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सिगारेटच्या पॅकेटवर मोठ्या अक्षरात लिहिलेले असते की सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक आहे. तरी सुद्धा अनेकजण व्यसनामुळे दिवसातून ८ ते १० वेळा सिगारेट ओढतात.
सिगारेट ओढल्याने फुफ्फुसांववर परिणाम होतात. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यचा वाढते . तसेच कॅन्सर सारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात.
तुम्हालाही सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर ते सहजासहजी सुटणार नाही. परंतु प्रयत्न केले तर काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही सोडू शकता.
जर तुम्ही दोन तासात १ सिगारेट ओढत असाल तर हा वेळेचा अंतर अजून वाढवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही दिवसभरात कमी सिगारेट ओढाल.
सिगारेटच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी तोंडात काही तरी चघळत राहा. जसे की, शुगरफ्री कॅन्डी, बबल गम किंवा चॅाकलेट.
ड्राय फ्रुट्सचा एक छोटा डब्बा नेहमी तुमच्याजवळ ठेवा. ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते. आणि सिगारेटची तलब लागणार नाही.
सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही दालचिनीचे सेवन करु शकता.याच्या चवीमुळे सिगारेटची तलब कमी होईल.
दररोज व्यायाम करा. स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहील आणि तुम्ही सिगारेटपासून दूर राहाल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.